Share

बाबा वेंगा यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ देशामध्ये दिसले एलियन्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जगात असे अनेक भविष्यवाणी करणारे झाले आहेत, जे त्यांच्या भविष्यवाणीमुळे जगभर ओळखले जातात. त्यापैकी बल्गेरियन बाबा वेंगा हे खूप प्रसिद्ध आहेत. बल्गेरियन बाबा वेंगा(Baba Venga) अंध आहेत. पण त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात, असा लोकांमध्ये समज आहे. त्यांनी एकूण सहा भविष्यवाण्या केल्या होत्या.(Will Baba Venga’s third prediction come true? Aliens seen in ‘this’ country; The video went viral on social media)

त्यापैकी दोन भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी २०२२ वर्षासाठी देखील एक भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीत बाबा वेंगा यांनी सांगितले होते की, “एलियन्स पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियन्स पृथ्वीवर पाठवतील.”

https://twitter.com/lovegaur3/status/1548197694971162625?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1548197694971162625%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Findia%2Fblind-psychic-baba-vengas-third-prediction-come-true-aliens-seen-in-america%2F637586

“पृथ्वीवरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी हा लघुग्रह पृथ्वीवर पाठवण्यात येईल.” बाबा वेंगा यांनी केलेला दावा खरा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेमधील एका व्यक्तीने एलियन्स पाहिल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीचे नाव डग्लस विंडसर मॅकइलोहन असे आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आले आहेत.

यासंदर्भातील पुरावे देखील डग्लस विंडसर मॅकइलोहन याने सादर केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एलियन्स फिरताना दिसत असल्याचे डग्लस विंडसर मॅकइलोहन याने सांगितले आहे. यासंदर्भात माहिती देताना डग्लस विंडसर मॅकइलोहन याने सांगितले की, “हा प्राणी खूप विचित्र असा होता. तो गुडघ्यावर चालत होता.”

“हा प्राणी एलियन्स सारखा वाटत होता. या प्राण्याचे शरीर माणसासारखे होते”, अशी माहिती डग्लस विंडसर मॅकइलोहन या व्यक्तीने दिली. ही घटना अमेरिकेमधील मुरहेड या शहरात घडली आहे. या घटनेमुळे बल्गेरियन बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी बाबा वांगे यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील दहशतवादी संघटना अल कायदाचा 9/11चा हल्ला यासह अनेक भाकिते केली होती. ही भाकिते अगदी खरी ठरली होती. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली होती. यासोबतच भूकंप होईल आणि त्सुनामी येईल, असेही सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :-
शिंदे गटात सामील होणार की शिवसेनेतच राहणार? खासदार संजय मंडलिकांनी दिले संकेत
कोकणातील बड्या नेत्याचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा; गंभीर आरोप करत म्हणाले शिवसेनाप्रमुखांनी…
शिंदे गटाशी जुळवून घेण्याचा सल्ला देणाऱ्या भावना गवळी शिंदे गटात सामील; पंधरा दिवसांत भूमिका बदलली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now