लग्नानंतर पत्नीच्या वागण्यावरून आला संशय; पतीने गुपचूप सुरू केले काॅल रेकाॅर्डींग अन् फुटले बिंग

लग्नात होणारी फसवणूक अशा घटनां जास्त प्रमाणात घडतांना दिसत आहे. असाच एक फसवणुकीचा प्रकार पुणे जिल्हयात उघडकीस आला आहे. पत्नीचे आधीच एक लग्न झाल्याचा संशय पतीला येताच आपली फसवणूक झाली आहे असे कळाले. त्यानंतर पतीने मोबाईलचा वापर करत कॉल रेकॉर्डिंग सुरू ठेवत हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पत्नी घरातील दागिने तसेच पैसे घेऊन जाण्याच्या प्रयत्नांत होती. परंतु रेकॉर्डिंगच्या मदतीने पत्नीचा हा बनाव फसला. पोलिसांनी पत्नीसह तिच्या नातेवाईकांना पकडले आहे. आंबेगाव तालुक्यात पारगाव येथे ही घटना घडली आहे.

पारगाव पोलिसांनी पळून जाण्याच्या बेतात असणारी विवाहित महिला, तिचा मुलगा आणि साथीदार यांना अटक केली आहे. यासह अजून तीन आरोपींचा तपास करत आहे. पोलिसांनी लता कोटलवार (वय५१), मनोज कोटलवार (वय २४), यास्मिन अन्वर बेग (वय २७) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव परिसरातील गणेश बांगर (वय२९) याच्यासाठी त्याचे वडील लग्नाला मुली शोधत होते. नातेवाईकांना याबाबत कल्पना होती. वसंत किसन थोरात (मंचर) यांना मुलगी पाहण्यास सांगितलेले होते. ओळखीचे असलेले वसंत यांनी मुलीची मागणी घेऊन आले होते.

मुलीला आईवडील नसल्याने मावशी सांभाळ करते असे घरी लग्नाच्या बैठकीत मुलीची मावशी अशी ओळख सांगितली होती. तसेच त्या अविवाहित आहे असेही संगीतले होते. वसंत थोरात यांनी लग्न जमवण्यासाठी दीड लाख देण्याची मागणी केली होती. मुलाचे लग्न होत नसल्याने वडिलांनाही ती रक्कम मान्य केली.

उद्या अमावस्या असून नंतर पौष महिना चालू होत आहे असे कारण देऊन लग्न आजच उरकवण्याचे गणेश वाळूज यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्याच संध्याकाळी गणेश आणि शीतल यांचे लग्न लावून देण्यात आले.

गणेश याला लग्नानंतर पत्नीवर शंका येऊ लागली. आपल्या पत्नीचा पहिला विवाह झाला असून तिला मुलंही असतील अशी शंका होती. कॉल रेकॉर्डिंग सुरू करून गणेशची शंका खरी ठरली. आणि तिचे आधीच लग्न झालेले आहेत हे उघडकीस आले.

गणेशला आपल्यासोबत लग्नाचा बनाव झाला आहे असे समजताच त्याने पत्नीचा पैसे आणि दागिने घेऊन जाण्याचे कारस्थान उघडकीस आले. गणेशच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलीसांनी आरोपीचा पाठलाग करत मंचर येथुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान शीतल खुडकूडे चा अधीक तपास केल्यानंतर तिचे खरे नाव यास्मिन अन्वर बेग असल्याचे कळाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
अमरीना प्रेमासाठी हिंदू धर्म स्वीकारून बनली राधिका, लग्न केल्यावर म्हणाली आता तिहेरी तलाकची भीती नाही
शिकता शिकता विद्यार्थिनीला झाले 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षकावर प्रेम; मंदिरात केले लग्न
Sexual Abuse: एक मुलगी ७ नराधम, प्रेमात फसवणूकीची भयानक कहाणी ऐकून तुमचाही उडेल थरकाप