धक्कादायक! पत्नीच्या ‘या’ मागणीला कंटाळून वनरक्षकाने वडाच्या झाडाला गळफास लावून केली आत्महत्या

बीड । राज्यात अनेक आत्महत्याच्या घटना घडत आहेत. मात्र पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी आत्महत्या करते अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील मात्र, याठिकाणी पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीडमध्ये एका वनरक्षकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आबासाहेब जगताप असून, तो वन विभागाच्या वनरक्षक म्हणून काम करत होता. अनिल यांचा विवाह २०१४ साली देसूर येथील अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरुर कडा येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला.

लग्नाअगोदरच्या पगारच्या खर्चाचा त्याची पत्नी हिशोब मागू लागली. तसेच तुमच्या आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर आई-वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यावर मारहाण केली होती.

तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करुन दे, असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु केल्याचा आरोप अनिलच्या वडिलांनी केला आहे. यावर्षीच्या मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली.

अनिलने वारंवार फोन करुनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिलला सांगितले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी शृंगेरी देवीचे समोरुन जाणार्‍या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अनिल जगताप यांच्या वडिलांचा जबाब नोंदवला होता, त्यानुसार तपास चालू होता. अखेर तपास पूर्ण झाला ज्यात अनिल जगताप यांच्या मृत्यूला पत्नी आश्विनी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे अनिलच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

अविनाश भोसले यांना ईडीचा दणका! ४० कोटींची मालमत्ता केली जप्त

बाप माणूस! रक्ताचे नाते नसतानाही स्वीकारले १५ अंध मुलांचे पितृत्व, वाचा सविस्तर

चहा आहे की सोनं? एक कप चहासाठी मोजावे लागतात १ हजार रुपये, काय आहे खासियत?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.