२२ वर्षांत पहिल्यांदाच बायकोने केला नाही मेकअप, नवऱ्याने दिली ही धक्कादायक प्रतिक्रिया

जवळपास सगळीकडेच पुरुष मेकअप करणाऱ्या महिलांची थट्टा करतात. कमी मेकअप करणाऱ्या महिलांचीदेखील पुरुष थट्टा करतात. मेकअप करणे ही जरी वयक्तिक बाब असली तरी तो नेहमी चर्चेचा विषय असतो. यामध्ये महिलांची टिंगल उडवली जाते.

लिपस्टिक, हलकासा थर, काजळ या मेकअपच्या सध्या गोष्टी आहेत. जेव्हा हातात पुरेसा वेळ आणि काही खास कार्यक्रम असेल तर महिला मेकअपला खूप वेळ घालवतात. परंतु काही महिला अशा असतात ज्या रोज खूप मेकअप करत असतात.

जर तिच्यासाठी रोज मेकअप करणे कंटाळवाणे जात असेल तर? अशीच एक महिला फक्त नवऱ्याला मेकअप आवडतो म्हणून २२ वर्षांपासून मेकअप करत होती. गेल्या २२ वर्षांपासून ही महिला आजारपणाचे दिवस सोडले तर रोज तासभर मेकअप करत असे.

आता तिला कंटाळा आला आणि तिने मेकअपच केला नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. स्लेड डॉट कॉममध्ये या महिलेने आपली समस्या मांडली होती. ती म्हणाली की आता मला रोज मेकअप करण्याचा कंटाळा आला आहे.

या कारणामुळे मी रविवारी मेकअप करत नाही. पण मी पूर्णपणे मेकअप करणे सोडत नाही थोडाफार क्रीम वगैरे लावते. इतर साधे कपडे घालते. पण माझ्या नवऱ्याला हे अजिबात आवडत नाही. हळूहळू ती अजागळ आणि गबाळ महिला बनेल असे त्याला वाटते.

तिचा उत्साह कमी झाला आहे असे त्याला वाटते. त्याचे म्हणणे आहे की रविवारचा लुक से’क्सी नाही. पण मी त्याला सांगते की शनिवार रविवार तो दाढी करत नाही तरी तो से’क्सी दिसतो. पण त्याला मात्र रविवारी माझं रूप से’क्सी वाटत नाही.

अजूनही ती रविवार सोडला तर रोज मेकअप करते. तिला असे वाटते की अंगणात काम करण्यासाठी किंवा दुकानात जाण्यासाठी इतका मेकअप करणे गरजेचे नाही. तरीही तिचा नवरा तिला पूर्ण मेकअप करण्यासाठी आग्रह करतो. तिला मेकअप करण्यासाठी दबाव आणतो. हे तिला खूप त्रासदायक ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करू पण…..; मध्य रेल्वेने दिली ही माहिती
२२ वर्षांत पहिल्यांदाच बायकोने केला नाही मेकअप, नवऱ्याने दिली ही धक्कादायक प्रतिक्रिया
फॅक्ट चेक: १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार?; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला धिंगाणा; रोहित पवारांवर अर्ध्यातून कार्यक्रम सोडण्याची नामुष्की

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.