पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सरदार जान मोहम्मद यांच्या घरात ६०व्या मुलानी जन्म घेतला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा येथील सरदार जान मोहम्मद यांच्या घरात रविवारी १ जानेवारी रोजी ६० व्या मुलाचा जन्म झाला. यापैकी ५ मुलांचा मृत्यू झाला असून बाकी ५५ मुलं स्वस्थ आहेत.
जान मोहम्मद हे पेशाने डॉक्टर असून त्यांचे क्वेटा येथे हॉस्पिटल आहे. माहितीनुसार मोहम्मद जान यांचे पहिले
लग्न १९९९ साली झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे ६० मुलं अल्लाह चा आशीर्वाद असून ते या ६० मुलांच्या जन्माने खूप आनंदी आहेत.
जान मोहम्मद यांनी आपल्या ६० व्या मुलाचे नाव हाजी खुशहाल खान ठेवले आहे. त्यांचे आतापर्यंत तीन लग्न झाले असून, पहिले लग्न १९९९ मध्ये झालेले आहे. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे वय २२ वर्ष आहे. जिचे नाव सगुफ्ता नसरीन असे आहे. जान मोहम्मद यांच्या बायका घरात मुलींना जास्त प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरदार हाजी जान मोहम्मद यांनी चौथे लग्न करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच ते चौथे लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, त्यांनी त्यांच्या मित्रांना आधीच सांगून ठेवले आहे जेणेकरून ते त्यांच्यासाठी मुलगी शोधतील. आयुष्य खूप लवकर निघून जात आहे म्हणून लवकरात लवकर लग्न व्हावे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.
अल्लाहचा आशीर्वाद असेल तर ५० वर्षाचे जान मोहम्मद इतक्यात थांबणार नसून अजून मुलांना जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या बायकांनाही तेच हवे आहे. ते सांगतात त्यांचा कोणताही मोठा व्यवसाय नाही. घराचा सगळा खर्च हॉस्पिटलच्या कमाईतुनच भागत असल्याचे त्यांनी संगीतले आहे. त्यांच्या अनेक मुली लग्नाच्या वयाच्या असल्या तरी त्यांना शिकवायचे आहे असेही त्यांनी सांगितले.
जान मोहम्मद यांना प्रवासाची आवड असून त्यांच्या मुलांनी पाकिस्तानच्या प्रत्येक भागाला भेट दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे. आता मुलांना1 गाडीत नेणे शक्य नाही असे ते स्वतःच सांगत असले तरी सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. पाकिस्तान सरकारने बस उपलब्ध करून द्यावी म्हणजे ते त्यांच्या मुलांना फिरायला घेऊन जातील.