Share

Uttar Pradesh :‘तुझं शरीर ५५ तुकड्यांत कापून ड्रममध्ये भरून टाकीन’, पत्नीच्या धमकीने हादरलेल्या नवऱ्याने घेतला कठोर निर्णय

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महोबा (Mahoba) जिल्ह्यात एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. कोतवाली क्षेत्रातील भटीपुर (Bhatipur) मोहल्ल्यात राहणारे शीलू रैकवार (Shilu Raikwar) वय ३०, हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा मिठाईचा व्यवसाय असून स्वतःचे दुकान आहे. २०२२ मध्ये त्यांनी आराधना (Aradhna) नावाच्या मुलीशी विवाह केला होता.

शीलू (Shilu) याने वर्ष २०२२ मध्ये बांदा (Banda) जिल्ह्यातील मटौंध (Mataundh) गावातील आराधना (Aradhana) हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण काही महिन्यांत आराधनाला PUBG या मोबाइल गेमची अतिशय व्यसनाधीन सवय लागली.

दिवसभर शीलू दुकानात काम करत असताना, आराधना घरी मोबाइल गेम खेळत बसायची. हाच काळ होता जेव्हा आराधनाची लुधियाना (Ludhiana, Punjab) येथील शिवम (Shivam) नावाच्या युवकाशी ओळख झाली आणि नंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर ती पतीपासून शारीरिक व मानसिकदृष्ट्या दूर जाऊ लागली. घरात सतत भांडणं वाढू लागली.

एका दिवसात परिस्थिती इतकी बिघडली की, आराधनाने शीलूला स्पष्ट धमकी दिली – “तुला ५५ तुकड्यांत कापून ड्रममध्ये भरून टाकीन”. एवढंच नव्हे, तिनं म्हटलं की जर तिनं प्रेमाच्या वाटेत कोणी अडथळा आणला, तर ती त्याचा जीव घेईल.

काही दिवसांतच आराधनाचा प्रियकर शिवम (Shivam) जवळपास ९०० किलोमीटर प्रवास करून थेट महोबा (Mahoba) येथे आराधनासाठी पोहोचला. त्यानंतर घरात मोठा गोंधळ झाला. या घटनेनंतर शीलू (Shilu) यांनी आपला व मुलाचा जीव वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला.

शीलूने अखेर कोतवाली पोलिस ठाणे (Kotwali Police Station) येथे शिवम (Shivam) विरोधात शांतीभंगाची तक्रार दाखल केली. पण सर्व नातेसंबंध संपुष्टात आणत आराधना (Aradhana) हिने आपला नवरा व मुलगा यांना सोडून शिवम (Shivam) बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शीलू (Shilu) ने त्यावेळी फक्त आपला व मुलाचा जीव वाचावा म्हणून पत्नीला तिच्या प्रियकरासोबत जाऊ दिलं.शीलू (Shilu) सध्या आपल्या मुलासोबत राहतो आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now