अशी बायको नको रे बाबा! बायकोने नवऱ्याचा १० लाखांत केला सौदा

जबलपूर | काही घटना असतात ज्या आपल्याला खळखळून हसवतात. पण त्या घटना वाचल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्काही बसतो की अशा घटनासुद्धा भारतात घडतात ज्या आपण फक्त चित्रपटात पहिल्या आहेत. पैशांची खूप गरज असलेल्या एका बायकोने थेट आपल्या नवऱ्याचा सौदा १० लाखांत केला.

२ मुलांचा बाप असलेल्या या नवऱ्याने सौदा थांबण्यासाठी थेट समुपदेशन केंद्रात धाव घेतली आणि हा सौदा थांबवण्यासाठी विनवणी केली. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. या अजब प्रकरामुळे समुपदेशन केंद्रसुद्धा विचारात पडले आहे.

कौटुंबिक समुपदेशन केंद्राला मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या नवऱ्याचे लग्न एका दुसऱ्या मुलीशी ठरवले. या लग्नासाठी तिने एक लाख रुपये ऍडव्हान्ससुद्धा घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून तिने नवऱ्याचे दुसरे लग्न लावण्याचा प्लॅन आखला आहे.

त्यासाठीचे व्यवहारसुद्धा तिने पक्के केले होते. मिळालेल्या माहितीनुसार तिचा नवरा जबलपूर येथील एका खाजगी शाळेत कुक म्हणून कामाला आहे. या शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीला तो प्रचंड आवडायचा आणि ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती.

त्याला मिळवण्यासाठी ती मुलगी काहीही करायला तयार होती. आणि ती मुलगी खूप श्रीमंत होती. ही गोष्ट त्या नवऱ्याच्या बायकोला कळली होती. गेल्या काही महिन्यांपासून पतीच्या मोबाईलवर अनोळखी नावाने मेसेज येत असल्याचे बायकोने पाहिले होते.

पत्नीने तो नंबर घेऊन संबंधित मुलीला संपर्क साधला. ती महिला त्या मुलीला भेटली आणि नवऱ्याचा सौदा केला. त्यासाठी दहा लाख रुपये देण्याचे ठरले. लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सोडून द्यावे लागेल हे माहीत असताना तिने हा सौदा केला होता.

ती मुलगी सतत स्वयंपाक घरात त्याला बघण्यासाठी येत होती. ती त्याच्याकडून आवडीचे पदार्थ बनवून घ्यायची. मग दोन स्त्रियांनी आपापसात सौदा करून नवऱ्याला विकले. एकदम चित्रपटात घडते त्याच प्रकारे हा सगळा प्रकार घडला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.