धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का

कन्नोजच्या हीरापुरवामध्ये भरपंचायतमध्ये एका महिलेने आपल्या प्रधान पतीला गोळी मारल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा मृत्यु झाला आहे. रागाच्या भरात त्या महिलेने आपल्या पतीला गोळी मारली आहे.

त्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत कट रचला होता आणि आपल्या पतीला पंचायतमध्ये बोलावले होते. या ठिकाणी अनेक लोकं उपस्थित होते, तरीही तिने कोणाचा विचार न करता पतीला गोळी मारुन ठार केले आहे.

त्यानंतर ती तरुणीने तिथून आपल्या प्रियकरासोबत पळ काढला होता. पण पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्या तरुणीसोबत तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. तिने आपल्या पतीची हत्या रविवारी केली होती.

त्या तरुणीचे नाव सीमा असे आहे. तिने तिचा पती म्हणजेच रामशरणची हत्या केली आहे. आरोपी शाम बिहारी आणि त्याचा भावाला पकडल्यानंतर त्या दोघांनी सीमाने हत्या केल्याचे सांगितले, तेव्हा पोलिस सीमाच्या घरी आले. त्यांनी सीमाला या हत्याबाबत विचारले असता तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.

रामशरण मला रोज त्रास देत होता. त्याच्यामुळे माझे पुर्ण आयुष्य उध्वस्त झाले होते. मला बदला घ्यायचा होता, त्यामुळे मी त्याची हत्या केली, असे सीमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

या हत्येप्रकरणी अजून ५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पाचही आरोपी फरार झाले आहे. त्या सर्वांचा पोलिस तपास करत आहे. सीमाने गुन्हा कबुल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी शाम बिहारीसोबत तिचे प्रेम संबंध होते.

महत्वाच्या बातम्या-

ओ तेरी! कोंबडीचा अंड्यासोबत जबरदस्त स्टंट, एकदा व्हिडिओ पहाच
VIDEO: पाठकबाईचा राऊडी अंदाज; बुलेटसोबत केले ‘असे’ काही की चाहते झाले हैराण
मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता हिंदू तरुण मात्र विरोध असल्याने उचललं असं पाऊल की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.