राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब योगायोग! पत्नी झाली महापौर तर पती विरोधी पक्षनेता

जळगाव येथील महापालिकेच्या महापौर निवडीत शिवसेनेने अडीच वर्षातून सत्ता खेचून आणली आहे. आता शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. यामध्ये शिवसेनेने सांगली महापालिकेचा पॅटर्न वापरला होता.

पण राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मोठी घडामोड घडली आहे. कारण महापालिकेचे महापौरपद ज्या महिलेकडे आले आहे तिचा नवरा विरोधी पक्षनेता आहे. पहिल्यांदाच असा योगायोग जुळून आला आहे.

भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत. जळगाव महापालिकेच्या २०१८ मध्ये निवडणूक जिंकून भाजपने ७५ पैकी ५७ जांगावर एकहाती सत्ता मिळवली होती.

या निवडणुकीत शिवसेनेला फक्त १५ जागा मिळाल्या होत्या. विरोधी पक्षनेत्याची भुमिका शिवसेनेचे सुनील महाजन हे पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अजूनही स्वतंत्र गट तयार करता आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते हे पद शिवसेनेकडेच राहिले आहे.

दरम्यान जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महपौर शिवसेनेचा असला तर आम्ही विरोधातच राहू, चुकीच्या कामांना महासभेत विरोध केला जाईल, अशी भुमिका भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
“महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट”
सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा
वडील वारले, आईने स्वत:ला जाळून घेतले, तरीही न खचता तो झाला पोलिस अधिकारी
‘पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.