कोलकाता। सध्या राज्यात कोरोनाचे संकट पसरले आहे. तर दुसरीकडे खळबळजनक घटनांचा जणू एखादा नवीन ट्रेंड सुरू झाल्यासारख रोज नवीन घटना समोर येत आहेत. आज आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
एका व्यक्तीला आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला असता. तिचे एक, दोन नाही तर जवळपास १४ लफडी असल्याचे समोर आले.
हे समजल्यावर सुरुवातीला त्याच्या पायाखालची जमीन सरकली, पण त्यानंतर त्याने जे काही केलं त्याचा तुम्ही कधी विचार देखील करू शकत नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथील एका व्यावसायिकाला आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले.
त्यानंतर त्याने तिचा पाठलाग केला असता तिचे जवळपास १४ प्रियकर असल्याचे समजले. त्यानंतर नवऱ्याने त्या सगळ्या १४ प्रियकरांना नोटीस पाठवली. ज्यामधून त्याने त्या सर्वांकडे १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
कारण त्या १४ जणांमुळे त्याचे वैवाहिक जीवन विस्कळीत झाले आहे. त्या नोटीसमध्ये व्यावसायिकाने असे म्हटले आहे की, ‘तुम्हांला नोटीस मिळाल्यानंतर दोन आठवड्यात मला १०० कोटी रुपये द्यावेत.
जर रक्कम मला मिळाली नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. मला समजले आहे की माझ्या बायकोबरोबर तुमचे शारिरीक संबंध आहेत. तुमच्यामुळे माझे वैवाहिक जीवन खराब झाले असून समाजातही माझी प्रतिमा धुळीस मिळाली आहे’.