जर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मेजर'(Major) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे. तेलुगू सुपरस्टार अदिवी शेष याने या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अभिनेता अदिवी शेष याने खूप मेहनत घेतली आहे. (wife crying talk about er husband in the army actress sai tamhankar shear video)
सध्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या शोदरम्यानचा चित्रपटगृहातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री सई मांजरेकरने देखील हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘मेजर’ चित्रपटाच्या शोदरम्यान चित्रपटगृहात एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी आपल्या पतीबद्दल इतर प्रेक्षकांना अभिमानाने सांगताना दिसत आहे.
यावेळी लष्करी अधिकाऱ्याची पत्नी भावुक पतीबद्दल सांगताना भावुक होत रडताना दिसत आहे. अभिनेत्री सई मांजरेकरने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सई मांजरेकरने लिहिले आहे की, “दिल्लीची पूजा यादव आपल्या पतीबद्दल बोलताना दिसत आहे. सैन्यदलात नोकरी करणाऱ्या आपल्या पतीविषयी पत्नी सांगत आहे.”
“सैनिकांच्या कुटूंबियांचं बलिदान ओळखण्यासाठी मेजर हा चित्रपट लोकांना मदत करत आहे, हे बघून मनात कृतज्ञतेची भावना येत आहे. या सर्व कुटूंबांना खूप शक्ती आणि प्रेम मिळो”, असे अभिनेत्री सई मांजरेकरने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘मेजर’ चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणारा अभिनेता अदिवी शेष याने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता अदिवी शेष हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच अभिनेता अदिवी शेषने एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता अदिवी शेषने लिहिले आहे की, “ही क्लिप मला व्हाट्सअपवर पाठवण्यात आली होती. ‘मेजर’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात देखील लोकांना आवडत आहे. ही प्रतिक्रिया पाहून मला अतिशय आनंद झाला आहे”, अशा आशयाची पोस्ट अभिनेता अदिवी शेषने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
शशी किरण टिक्का यांनी ‘मेजर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई मांजरेकरने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांनी ‘मेजर’ चित्रपट पहिला होता. अभिनेता अदिवी शेषने मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही
चार दिवस ‘या’ लोकांबरोबर राहावं लागेल; मराठी अभिनेत्रीने सांगितले बॉलिवूडचे काळे सत्य
मोठे देशभक्त आहे रतन टाटा, भारतातील शास्त्रज्ञांसाठी वाचवला ‘हा’ स्टार्टअप; प्रसिद्ध उद्योगपतीने सांगितला किस्सा