पाकिस्तानमधील कराची येथे एका पत्नीने आपल्या नवऱ्याला त्या वेळेस बदडले जेव्हा तो तिसरे लग्न करत होता. पाकिस्तान मिडीया रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाने आरोप लावला आहे की त्याला मंडपात घुसून जबरदस्तीने मारहाण करण्यात आली आहे.
त्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीसही म्हणाले की आम्ही नवरदेवाला अटक करू शकत नाही कारण त्याच्याविरोधात काहीच पुरावे नाहीत. दोन्ही पक्षांना सल्ला देण्यात आला आहे की तुम्ही हे प्रकरण मिटवण्यासाठी कोर्टाची मदत घेऊ शकता.
पोलिस म्हणाले की नवरदेव या मारहाणीत जखमी झाला आहे आणि त्याला ज्यांनी मारहाण केली त्यांच्याविरोधात कारवाई करायची आहे. सध्या त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. नवरदेवाने मिडियाला सांगितले की, जिने मला मारहाण केली ती माझी पहिली पत्नी आहे.
आमच्या दोघांमध्ये काहीही संबंध राहिलेला नाही. काही दिवसांपुर्वीच माझे तिच्याशी सर्व संबंध तुटले होते. मी तिला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे आणि माझे वकीलसुद्धा तिच्याशी बोलणार आहेत. पण त्याची पहिली पत्नी म्हणाली की २०१८ मध्ये त्याने मला न सांगता लपून छपून दुसरे लग्न केले होते.
आताही मला न सांगता तो तिसरे लग्न करत होता. त्याला मी तिसरे लग्न करताना रंगे हात पकडले. १९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये नवीन कायदा लागू करण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये नियम आहे की, जर तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर पहिल्या पत्नीकडून लिखित स्वरूपात अनुमती घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पत्नीला मिठी मारून लोकलमधुन दिले ढकलून; मुंबईतील धक्कादायक घटना
“राजकारण एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो”
जाणून घ्या कुठे गायब झाली सलमान खानची ‘सनम बेफवा’ चित्रपटातील अभिनेत्री चांदनी
घटस्फोट झाला नाही तरीही त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर; जाणून घ्या कारण