Share

Loni Kalbhor : पत्नीचं अफेअर माहिती असतानाही कार घेतली, ३ लाख खर्चाला दिले, मग जीव घेण्याएवढं काय बिनसलं? पुण्यातील भयंकर घटना

Loni Kalbhor : पुण्यातील लोणी काळभोर येथे अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविंद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविंद्र झोपेत असताना मध्यरात्री फावड्याच्या दांडक्याने डोक्यात घाव घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

गुन्ह्याचा अवघ्या तीन तासांत छडा

लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने तपास करून त्यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (वय ४२) आणि तिचा प्रियकर गोरख त्रिंबक काळभोर (वय ४१, रा. वडाळेवस्ती, लोणी काळभोर) यांना अवघ्या तीन तासांत अटक केली. ही घटना सोमवारी (दि. ११) मध्यरात्री २ वाजता घडली.

काय आहे हत्या प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख आणि शोभा यांच्यात अनैतिक संबंध होते. हा प्रकार रविंद्र यांना माहिती असल्याने त्यावरून वारंवार वाद होत होते. दारूच्या आहारी गेलेल्या रविंद्रकडून पत्नीवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून, तिने प्रियकरासोबत कट रचत पतीला संपवण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी (दि. २९) रविंद्र आणि शोभामध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर ती मुलांना घेऊन माहेरी थेऊरला निघून गेली. रविंद्र यांचा कायमचा काटा काढण्यासाठी शोभा आणि गोरखने कट रचला.

हत्या करण्याची रात्र आणि गुन्ह्याची अंमलबजावणी

रविंद्र आणि गोरख हे एकाच गावातील रहिवासी असून, त्यांचे घरे शंभर मीटर अंतरावर आहेत. दोघांनी मिळून चारचाकी गाडी खरेदी केली होती आणि गोरखने रविंद्रला ३.५ लाख रुपये दिले होते.

सोमवारी (दि. ३१) शोभा माहेरी गेल्यामुळे रविंद्र घरी एकटे होते. त्यादिवशी त्यांनी मद्यप्राशन केले. रात्री गोरख त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला आणि त्यानंतर ते अकराच्या सुमारास घराबाहेर झोपले.

मध्यरात्री २ वाजता गोरख त्यांच्या घरी आला आणि झोपेत असलेल्या रविंद्रच्या डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरदार वार केले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा करून गोरख घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांचा जलद तपास, तांत्रिक विश्लेषणातून सुगावा

मंगळवारी (दि. १) सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, रविंद्र काळभोर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस तपासादरम्यान, शोभा आणि गोरख यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.
त्याचबरोबर गुन्ह्याच्या रात्री ९ वाजता आणि मध्यरात्री २ वाजल्यानंतर दोघांचे फोनवर संवाद झाल्याचे तांत्रिक विश्लेषणातून स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, आरोपींवर पुढील कारवाई केली जात आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now