Share

सामना हारला पण क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली, नेपाळच्या विकेट कीपरचं जगभरात होतंय कौतूक; पहा व्हिडिओ

टी २० विश्वचषक २०२२ क्वालिफायर सामने सुरू होण्यापूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. सोमवारी नेपाळ आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेख हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने आपल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकून घेतली आहे. (wicket keeper asif shaikh viral video)

आयर्लंडच्या खेळाडूला धावबाद करण्याची संधी शेखने गमावली असेल, पण जगभरातून त्याचे कौतुक होत आहे. या सामन्यात आसिफने तमाम क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. आसिफचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा फलंदाज मार्क हैदरने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या बॅटच्या मध्यभागी लागला नाही. बॅटच्या आतील काठावर आदळल्याने चेंडू खेळपट्टीजवळ पडला. त्यानंतर हैदर धाव घेण्यासाठी धावला. त्याचवेळी नेपाळचा गोलंदाज कमल सिंगही चेंडू पकडण्यासाठी धावला आणि दुसऱ्या टोकाकडून येणारा फलंदाज अँडी मॅकब्राईनशी टक्कर त्याची टक्कर झाली. मॅकब्राईन जमिनीवर पडला आणि कमलने चेंडू पकडला आणि यष्टीरक्षकाकडे दिला.

नेपाळचा यष्टिरक्षक आसिफ शेखकडे भरपूर वेळ होता आणि तो मॅकब्राईनला सहज बाद करू शकला असता. मात्र, त्याने तसे केले नाही आणि मॅकब्राईन सहज क्रीजवर पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मॅकब्राईन खाली पडला होता, त्यामुळे आसिफने त्याला बाद केले नाही, त्यामुळे आसिफ शेखचे कौतुक होत आहे. त्याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करत आहेत. नेपाळच्या गोलंदाजामुळे मॅकब्राईन पडला होता आणि तो धावबाद होणार याची खात्री होती, पण असिफने खिलाडूवृत्ती दाखवत मॅकब्राईनला बाद केले नाही. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. आता आसिफ २०२२ च्या स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्काराचा दावेदार बनला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ नऊ गडी गमावून केवळ १११ धावाच करू शकला. त्यामुळे नेपाळने १६ धावांनी सामना गमावला. आयर्लंडकडून जॉर्ज डॉकरेलने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्टिस केम्पफरने २० धावा केल्या. नेपाळच्या अविनाश बोहराने दोन गडी बाद केले. त्याचबरोबर नेपाळकडून दीपेंद्र सिंगने सर्वाधिक २८ धावा केल्या. आसिफ शेखनेही २३ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-
देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल; संजय राऊतांची जीभ घसरली
‘रावसाहेब दानवेंना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय’, फुकट वडापाव प्रकरणात नवा खुलासा
दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, तिन्ही अपघात सारखेच, घातपाताचा संशय आल्याने उचलणार ‘हे’ पाऊल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now