अखेर गुपित फुटलेच! मुलांची नाव तैमुर व जहांगीर का ठेवली? करीनाने स्वतःच केला खुलासा…

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चर्चेचा विषय ठरते. करीनाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटमध्ये काम केले आहेत. करीना नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनावर राज करत असते. तिला चाहत्यांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळत असते. करीनाचे चित्रपट पडद्यावर भरपूर कमाई करतात.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या कौटुंबिक जीवनामुळे जास्त चर्चेत राहतात. करीना आणि सैफचे खूप मोठे फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळतात. तसेच त्यांना सोशल मीडियावर अनेक वेळा ट्रोलही केले जाते.

केवळ करीना आणि सैफच नाही तर त्यांची दोन मुले तैमूर आणि जहांगीर यांनाही त्यांच्या नावांमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. आता पहिल्यांदा करीना कपूरने या विषयावर स्पष्ट उत्तर दिले आहे.

करीना म्हणते की तिला आणि सैफला तैमूर आणि जहांगीर ही नावे आवडली आणि केवळ यामुळेच त्यांनी आपल्या मुलांची नावे ठेवली. करीना म्हणाली की जेव्हा मुलांना फक्त त्यांच्या नावासाठी ट्रोल केले जाते तेव्हा तिला वाईट वाटते.

It's a boy for Kareena Kapoor and Saif Ali Khan: From Alia Bhatt to Dia  Mirza, wishes pour in from Bollywood | Entertainment-photos – Gulf News

‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, प्रामाणिकपणे सांगायचे तर, ही फक्त आपल्याला आवडणारी नावे आहेत, दुसरे काही नाही. ही सुंदर नावे आहेत आणि ती दोन्ही सुंदर बाळ आहेत. कोणीही माझ्या मुलांना ट्रोल का करावे हे अतिशय दुःखदायक आहे. मला वाईट वाटते पण मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझे आयुष्य ट्रोल्स नुसार जगू शकत नाही.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, करीना कपूर आता तिचा पुढचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चे हिंदी रूपांतर आहे. याशिवाय करीना कपूरने इतक्यातच हंसल मेहता आणि एकता कपूरसोबत तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.

तसेच करीना कामासोबतच तिच्या फिटनेसवरही तितकेच लक्ष देताना पाहायला मिळते. त्यामुळे ती ट्रोलर्सना इंटरटेन न करताना आपल्या कामावर आणि फिटनेसवर लक्ष देते. याचबरोबर तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या चित्रपटांबाबत नेहमीच उत्सुकता असते.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेची सुशांत सिंह राजपूतसोबतची पहिली भेट होती खूप भयानक; अभिनेत्रीने जुन्या आठवणींना दिला उजाळा…
खुशखबरः! सरकारकडून मिळणार १५ लाख… जाणून घ्या नेमकी काय आहे योजना
“आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांवर संस्कार करणं गरजेचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.