भारतीय संघात विराटसारखा कर्णधारच झाला नाही! ‘ही’ आकडेवारी पाहूण तुम्हीही म्हणाल खरं आहे

टीम इंडियाने इंग्लंडमध्ये दमदार विजय मिळवला आहे. ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव करून इतिहास रचला. भारताने पन्नास वर्षांनंतर ओव्हलवर एक कसोटी सामना जिंकला आहे. आणि यासह संघाने स्वतःचा एक जुना पराक्रम पुन्हा केला आहे. गेल्या वेळी देखील भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा पराक्रम केला होता.

ओव्हलवर पहिल्या डावात २०० पेक्षा कमी धावांवर ऑलआऊट असूनही टीम इंडियाने हा सामना आपल्या पकडीत आणला. आणि त्याआधी हे फक्त एकदाच घडले जेव्हा भारताने परदेशी भूमीवर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दोनशे पेक्षाकमी धावांकरुन बाद झाल्यानंतर सामना जिंकला होता.

याआधी भारतीय संघाने जोहान्सबर्ग येथे २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्या सामन्यात, भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या १८७ धावांवर बाद झाला होता. पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्या सामन्यात आपली प्रतिभा दाखवली की टीम इंडियाने हा सामना ६३ धावांनी जिंकला.

जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच आणि मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये अशी दुसरी वेळ होती जेव्हा संघासाठी सर्व २० विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.

ओव्हल कसोटीतही भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १९१ धावा करू शकला. आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडला पहिल्या डावात फक्त २९० धावाच करता आल्या. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सामना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली.

तीन अर्धशतके आणि एका शतकाच्या जोरावर भारताने फळीवर ४६६ धावा केल्या. आणि इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही भक्कम होती. १०० धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. सामना इंग्लंडच्या दिशेने जात होता की भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करायला सुरुवात केली.

दुपारच्या जेवणानंतर बुमराह आणि जडेजाने ६ धावांच्या आत चार विकेट घेतल्या आणि सामना उलटवला. त्यामुळे शेवटी इंग्लंडला २१० धावाच करता आल्या आणि ते सामना हरले. भारत मालिकेत २-१ ने पुढे आहे. मालिकेचा पाचवा सामना 10 सप्टेंबरपासून ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या-

‘असा’ ओळखा डेंग्यु आणि सामान्य तापामध्ये फरक अन् वेळीच घ्या उपचार; वाचा सविस्तर
अखेर ठरलं! राज्यातील कॉलेज ‘या’ तारखेपासून सुरु होणार; उदय सामंत यांनी केली घोषणा
काय सांगता! लाल भेंडीची लागवड करून शेतकरी झाला मालामाल, किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.