भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

आज विनोद खन्ना आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांच्या आठवणी आणि चित्रपट नेहमी आपल्यासोबत असतील. विनोद खन्ना बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. ८० च्या दशकामध्ये विनोद खन्ना बॉलीवूडचे सर्वात हँडसम अभिनेते आहेत.

विनोद खन्नाला त्यांच्या अभिनयामुळे खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याचबरोबर विनोद खन्नाला त्यांच्या स्वभावासाठी देखील खुप ओळखले जायचे. कारण त्यांचा स्वभाव खुप प्रेमळ आणि शांत होता.

८० च्या दशकामध्ये विनोद खन्ना त्यांच्या करिअरच्या टॉपवर होते. त्यांना बॉलीवूडचे नेक्स्ट सुपरस्टार समजले जाऊ लागले होते. करिअरच्या टॉपवर असताना त्यांनी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते ओशोच्या आश्रमात गेले.

प्रसिद्धी झोकात असताना विनोद खन्नाने आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा ते विवाहित होते आणि त्यांना मुले देखील होते. जवळपास पाच वर्षांसाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला आणि हा काळ ते झगमगाटापासून दूर राहिले.

त्यावेळी विनोद खन्नाच्या कुटुंबाचे त्यांच्या या निर्णयावर काय मत होते. याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडले असतील. तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

विनोद खन्नाने हा निर्णय घेतला तेव्हा अक्षय खन्ना पाच वर्षांचे होते. आपल्या वडिलांच्या या निर्णयावर अक्षय खन्नाची प्रतिक्रिया खुप साधी होती. कारण तो तेव्हा खुप लहान होता. त्याला काहीही कळत नव्हते. या गोष्टीचा खुलासा अक्षय खन्नाने एका मुलाखतीमध्ये केला होता.

तो म्हणाला की, मी खुप लहान होतो. माझे वडील कुठे जात आहेत? कशासाठी जात आहेत? याची मला काही कल्पना नव्हती. त्यामूळे मी काहीही बोललो नाही. पण पाच वर्षे मी माझ्या वडिलांना भेटलो नाही. तेव्हा मात्र मी प्रश्न विचारायला सुरुवात केली’.

मी घरात सर्वांना वडिलांबद्दल विचारायचो. पण मला कोणीही काहीही सांगत नव्हते. त्यावेळी मला बाहेरून समजतं होते की, माझे वडील आश्रमात गेले आहेत. मी अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. त्यानंतर मला सगळे काही समजले.

‘संन्यास म्हणजे फक्त कुटुंबाला सोडणंच नव्हे. तर संन्यास घेणे म्हणजे एका अर्थी संपूर्ण आयुष्यच वाहून देणे. कुटुंब हा तर त्याचा एक एक भाग आहे. हा निर्णयच मुळात आयुष्य बदलून टाकणारा असतो. त्यावेळी त्यांना हा निर्णय घ्यावासा वाटला. एक पाच वर्षांचा मुलगा म्हणून मला तेव्हा काही समजले नव्हते. पण, आता मला ते कळत आहे’, असे तो म्हणाला होता.

आयुष्याच्या एका टप्प्यावर सारंकाही असूनही काहीतरी आणखी मिळव्यासाठीची ती अनुभूती होती. असे म्हणत एका वेगळ्याच भावनेनं किंवा जाणीवेनं त्यांच्या अंतर्मनाला साद घातली होती. असे त्याने सांगितले. अक्षय खन्नाने अतिशय संवेदनशीलपणे त्याने या प्रसंगाकडे पाहिले.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

‘या’ कारणामुळे बाॅलीवूडची सर्वात हिट जोडी अक्षयकुमार-सुनील शेट्टी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते

ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

या’ व्यक्तिने दिली सुशांतचा मित्र सॅम्यूअलला जीवे मारण्याची धमकी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.