आपल्या घरातील लाईटबील जास्त का येते जाणून घ्या अन्यथा असेच लुटले जाल

वीज बिला संबंधीत अनेक तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक वेळा चुकीचे रीडिंग घेतले जाते. काही लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊ कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे गरजेचे आहे. तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे.

तसेच जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कारण आपल्याला माहित असेल कि १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे. पण जर रीडिंग लेट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील.

नियमानुसार युनिट १०० च्या वर गेले तर साधारण ७.६० रुपये प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि जर का हेच युनिट जरा का ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील. म्हणजेच निष्काळजीपणा आपल्याला महागात पासु शकतो.

अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, काही कारणास्तव आपल्या भागातील ट्रान्सफॉर्मर बिघडला असल्यास २४ तासाच्या आत तो दुरुस्त करणे ही जबाबदारी वीज कंपनीची असते. अन्यथा हा ट्रान्सफॉर्मर २४ तासाच्या आत दुरुस्त नाही झाला तर प्रति तास ५० रुपये भरपाई ग्राहकास मिळते आणि हा प्रत्येकाचा हक्क आहे.

काही वेळा आपल्या मीटरचा फोटो ना काढता आपल्याला अंदाजे लाईट बिल येते असे झाल्यास हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तसेच जर आपले वीज बिल काही कारणास्तव थकले असेल आणि जर कंपनीला आपला वीज पुरवठा बंद करायचा असेल तर एक महिना आधी आपल्याला स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.

तसेच एखाद्याचे घर जर शेतात असेल तर त्याला दिवसा आणि रात्री सुद्धा वीज असणे अनिवार्य आहे. तसेच आपल्या शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० रुपये भाडे मिळते. विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५ नुसार जिल्हा न्यायदंडाधिकारी आपल्याला विहित भरपाई देण्यास सक्षम असतात.

तसेच जर काही चुकीमुळे एकदा व्यक्ती मेला किंवा जखमी झाला तर त्यांना ५ ते १० लाख भरपाई देण्याची जबाबदारी ही जिल्हा न्यायदंडाधिकारी याची असते. त्यामुळेच आपण आपले हक्क जाणून घ्या आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा.

हे ही वाचा-

बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज

‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार

जगातील सर्वात स्वस्त फोन गणेश चतुर्थीला येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.