कोण आहेत शीतल आमटे? का करावी लागली त्यांना आत्महत्या? वाचा संपूर्ण प्रकरण..

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांच्या नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शितल आमटे यांनी आज आत्म.हत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

शितल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात.

शितल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.

डॉ. शीतल आमटे यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले. डॉ. शीतल यांच्या फेसबुक लाइव्हनंतर समाजात गैरसमज पसरू नये म्हणून आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले होते.

२०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये डॉ. शीतल व त्यांचे पती गौतम यांनाही स्थान देण्यात आले होते. शीतल आमटे या सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी तर त्यांचे पती गौतम कराजगी अंतर्गंत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

स्व.बाबा आमटे यांनी सुरु केलेले अनेक उपक्रम बंद पडले आहेत, कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप, आनंदवनाच्या कारभारात कॉर्पोरेट संस्कृतीचा शिरकाव असे अनेक आरोप आनंदवनात होऊ लागले होते. मात्र, डॉ, शीतल आमटे यांनी वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावत त्यावर स्पष्टीकरणही दिले होतं. अजून मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही.

कोरोनावरील लस कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली वेळ 

शपथविधी आधी जो बायडन जखमी, पायाला मोठी दुखापत..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.