रोहित शर्मा ठणठणीत असतानाही त्याचं नाव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून का वगळण्यात आले?

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी निवड झालेली नाही. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्माने स्वत: ला तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे.

या सर्व प्रकारांमध्ये, एक महिन्यानंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास तंदुरुस्त असलेला खेळाडू कसा अयोग्य ठरू शकेल, असा सवाल बीसीसीआयला केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी घोषणा करण्यात आली. खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचे नाव गायब झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितच्या दुखापतीचे कारण दिले.

एकिकडे रोहित स्वत:च आपण चांगल्या अवस्थेत असल्याचे सांगत असतानाही दुसरीकडे मात्र त्याची निवड न होण्याचे कारण काय?

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यानंतरही आपल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीबाबत सांगताना मैदानात परतून आपल्याला फार चांगले वाटत आहे. आणि मी आणखी काही सामने खेळण्यास तयार आहे. असे रोहित म्हणाला.

खरंतरं चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही गौतम गंभीरला संघातून वगळण्यात आले होते. अनेकांनानी या संदर्भात गौतम गंभीरशी त्याची तुलना केली आहे. आता रोहित शर्माचेही हेच हाल होते का? हे लवकरच कळेल.

खाजगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! पगार वाढीसह मिळणार ‘या’ गोष्टी

“मुसोलिनीचा उजवा हात असलेल्या पित्याची मुलगी भारतात माफियाराज आणू पाहत आहे”

“चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.