रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीचा मराठी चित्रपट वेड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतांना दिसत आहेत. अशातच प्रमोशन दरम्यान त्यांनी काही कौंटुंबिक किस्सेही उलगडले आहेत. सणउत्सवाच्या निमित्ताने रितेश मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतोच.
अनेकदा त्यांची मुलं पापाराझी फोटोग्राफर्स समोर हात जोडून नमस्कार करतांना दिसतात. जेव्हाही त्यांचे फोटो काढले जातात तेव्हा ते हात जोडून नमस्कार करतात आणि फोटोग्राफर्सला थँक यू असे म्हणतात. यामागचे कारण विचारता, रितेश ने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांची मने जिंकली आहेत.
सेलिब्रिटी आणि त्यांची मुलं म्हटले की कॅमेरा फोटो काढण्यासाठी आपोआप तिकडे वळतोच. काही सेलेब्रिटी त्यांच्या मुलांना पापाराझीपासून दूर ठेवतांनाही दिसतात. परंतु रितेश आणि जेनेलिया ने आपल्या मुलांना याबाबत काही गोष्टी आधीच सांगून ठेवल्या आहेत.
जेव्हा रितेशला विचारण्यात आले की, तुमची मुलं कॅमेरासमोर हात का जोडतात? तेव्हा रितेशने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत.
रितेश म्हणाला, तुमचे आई बाबा जे काम करतात त्यासाठी त्यांचे फोटो काढले जातात आणि तुम्ही आमची मुलं आहात म्हणून तुमचे देखील फोटो काढले जातात. परंतु तुमचे फोटो काढावे असे तुम्ही काहीच केलेले नाही म्हणून तुम्ही हात जोडून त्यांचे आभार मानायला हवे. असे रितेशने सांगितले.
अशी शिकवण रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलांना आधीच दिली आहे म्हणून ते सर्वत्र पापाराझी समोर हात जोडतांना दिसत असतात