ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर खेळाच्या स्पर्धेत विजेते खेळाडू आपले सुवर्णपदक का चावतात?

राष्ट्रकुल स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी भरवल्या जातात. अनेक खेळाडूंचे स्वप्न असले की, या स्पर्धांमध्ये कमीत कमी एक सुवर्णपदक आपल्या देशासाठी मिळवून आणावे. कारण सुवर्णपदक मिळवण्याचा क्षणच वेगळा आणि आनंददायक असतो.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावते. जेव्हा विजेत्यांना सुवर्णपदक दिले जाते तेव्हा अनेक प्रेषक हा समारंभ बघत असतात.

तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्पर्धक ते पदक दाताने का चावतो? याच्या मागे खूप मजेशीर कारण आहे. विजेत्याने ते सुवर्णपदक दाताखाली चावलेच पाहिजे असा काही नियम नाही. पण तुम्ही पाहिले असेल अनेकवेळा फोटोग्राफर ते पदक दाताने चावायला सांगतात.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातपण तसाच फोटो छापून येतो. तर यामागे कारण असे आहे की, फार वर्षांपूर्वी सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी ते दाताने चावले जायचे किंवा तशी पद्धत होती.

शुद्ध सोने अतिशय नरम असते. ते चावले तर त्याच्यावर दातांचे निशाण लगेच उमटतात. तर अंदाज असा आहे की, आपल्याला मिळालेले मेडल किती खरे आहे हे पाहण्यासाठी ते दाताने चावण्याची पद्धत पडली असावी. वास्तविक पाहता आता मिळणारी मेडल्स ही शुद्ध सोन्याची नसतात.

१९१२ पासून या मेडल्सवर ६ ग्रॅम सोन्याचे पाणी चढवले जाते. सध्याचे मेडल्स हे स्टर्लिंग चांदीचे असतात आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. खेळाडूंनासुद्धा हे माहीत असते तरीही ते चावून पाहतात असे बोलले जाते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.