म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी निभावलेल्या भुमिका प्रेक्षकांना खुप जास्त आवडल्या. त्या भुमिकेला कितीही वर्ष झाली तरी प्रेक्षक ती भुमिका विसरत नाहीत. असे अनेक चित्रपट आणि मालिका बॉलीवूडमध्ये अजरामर आहेत.

अशाच एका अभिनेत्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्याचे नाव आहे मुकेश खन्ना. मुकेश खन्ना ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांची प्रसिद्धी आजही कमी झाली आहे.

९० च्या दशकात मुकेश खन्ना प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राज्य करत होते. महाभारतामध्ये भीष्म पितामह बनून त्यांनी वृद्ध माणसांची मने जिंकली. तर ‘शक्तिमान’ बनून लहान मुलांच्या मनात राज्य केले. लहान असो किंवा मोठे प्रत्येकाच्या मनात मुकेश खन्ना राज्य करतात.

मुकेश खन्नाचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांना इंजिनिअरिंग करायची होती. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली. म्हणून त्यांनी अभिनयात डिग्री पुर्ण केली आणि बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम मिळत होते. पण प्रसिद्धी मात्र मिळत नव्हती.

काही दिवसांनी त्यांना चित्रपटांच्या ऑफर येणे बंद झाल्या. मुकेश खन्ना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला दोन वर्षे घरात बसून होते. त्यांना कोणीही काम दिले नाही. याच कालावधीमध्ये त्यांना टेलिव्हिजनवर काम करण्याची संधी मिळाली.

बी.आर. चोप्रा त्यांच्या ‘महाभारत’ मालिकेसाठी अभिनेते शोधत होते. त्यावेळी त्यांना मुकेश खन्नाची आठवण आली. सुरुवातीला महाभारतामध्ये मुकेश खन्ना द्रोणाचार्यची भुमिका निभावणार होते. पण शेवटच्या क्षणी बी.आर.चोप्राने मुकेश खन्नाला भीष्म पितामहच्या भुमिकेसाठी फायनल केले.

या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवर खुप जास्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजनवरची सर्वात प्रसिद्ध मालिका ‘शक्तिमान’ची निर्मिती केली आणि ते बनले टेलिव्हिजनवरचे गंगाधर. ९० च्या दशकात शक्तिमान मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली.

आजही अनेकांना शक्तिमान ही मालिका पाहायला आवडते. इंडियन टेलिव्हिजनच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यामध्ये मुकेश खन्नाचे नाव येते. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुकेश यांनी अजूनही लग्न केले नाही.

त्यांच्या लग्न न करण्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या मागचे खरे कारण सांगणार आहोत. मुकेश खन्नाने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल असलेल्या अनेक अफवांबद्दल देखील सांगितले.

मुकेश खन्ना म्हणाले की, ‘माझ्या लग्नाबद्दल अनेक अफवा आहेत. पण त्या सर्व खोट्या आहेत. अनेकांना असे वाटते की, मी महाभारतात भीष्म पितामह यांची भुमिका निभावली होती. ती मी माझ्या खऱ्या आयुष्यातही लागू केली आहे. म्हणून मी लग्न केले नाही. ही गोष्ट खोटी आहे’.

‘माझा लग्नाला विरोध नाही. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेले असते. पण प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेले नसते. लग्न हे खुप महत्त्वाचे असते. दोन कुटुंबांचा तो संगम असतो. तुमची आयुष्यभर सोबत राहण्याची तयारी हवी.’ असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ‘माझे लग्न व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. आत्ता मी लग्न करायचे म्हंटल तर मला योग्य मुलगी भेटणार नाही. लग्न ही माझी खासगी बाब आहे. माझे लग्न अजूनही झाले नाही. त्यामुळे माझ्या लग्नाबद्दल होणाऱ्या अफवा थांबवाव्यात.’

मुकेश खन्नांनी अजूनही लग्न केले नाही. म्हणून त्यांना बॉलीवूडचे संन्यासी म्हटले जाते. सध्या ते अभिनय क्षेत्रापासून लांब आहेत. पण लवकरच ते त्यांच्या प्रसिद्ध शो शक्तिमान परत आणणार आहेत. त्यामूळे सर्वजण या शोची वाट बघत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

टिव्हीवरची छोटी काॅमेडीयन गंगुबाई आठवतीय? आता इतकी सुंदर दिसतेय की विश्वास बसनार नाही

फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

भोळ्या भाबड्या दयाभाभीने ‘बी’ ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले आहे; सीन पहाल तर शाॅक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.