मुंबई | आताच्या काळात आपल्याला प्रत्येक वस्तूवर डिस्काऊंट हवा असतो. कंपनी किंवा डीलर अनेकदा विक्री वाढवण्यासाठी अशा ऑफर ग्राहकांसाठी ठेवत असतात. अशात या डिस्काऊंट ऑफरवरुनच मारुती सुझुकी ही मोठी कार कंपनी वादात सापडण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी कंपनीने चक्क डीलरला डिस्काऊंट द्यायला मनाई केल्याचे समोर आले आहे.
मारुतीच्या गाड्यांवर डिस्काऊंट नसतो किंवा तो असेल तरीही अगदी थोडाफार दिला जातो. मारुतीच्या गाड्यांवर डिस्काऊंट का नसेल असा प्रश्न सहज पडतो. पण कंपनी मोठी तीच्या गाड्यांना मागणी जास्त आहे. असे त्याचे उत्तर तयार असते. तसेच या कंपनीच्या गाड्यांसाठी वेटींग असते. ग्राहकाला असेल त्या किंमतीत वाहन खरेदी करावे लागते आहे.
दरम्यान, या डिस्काऊंट न देण्याच्या खेळात ग्राहकांची लूट होत असल्याचे समजते आहे. यासाठी भारतीय प्रतिस्पर्धा आयोग(सीसीआई) मारुती सुझुकीविरोधात सुरु असलेली चौकशी पुर्ण केली आहे. या चौकशीत मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहेत. या माहितीच्या आधारे मारुती सुझुकी कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बाजारपेठेतील बऱ्याच कंपन्या त्यांच्या कारवर भरपुर मोठा डिस्काऊंट देत आहेत. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी मारुती सुझुकीचे डीलर डिस्काऊंट देण्यास तयार आहेत. मात्र कंपनीने त्यासाठी सक्त मनाई केली आहे. याबाबत कंपनी कार विकताना विमा योजना सुचवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना जास्त प्रिमिअम भरावा लागत आहे.
२०१९ मध्ये कंपनीच्या एका डीलरने कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. मारुती सुझुकी ल्युब्रिकंट किंवा विम्यासाठी तीच्या पंसंतीच्या कंपनीला प्रोत्साहन देत आहे. हे भारतीय कायद्यात चुकेचं ठरत आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासात दिलेला अहवाल आयोगाने स्वीकारल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते.
कंपनीवर लावलेले हे आरोप सिद्ध झाल्यास सुझुकीच्या ग्राहकांसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच भारतात मारुती सुझुकी ही एक मोठी कंपनी आहे. कंपनीवर आशा प्रकारचे आरोप लागल्यास कंपनीला याचे मोठे नुकसान होऊ शकते. आता मारुती सुझुकीकडून यावर काय स्पष्टीकरण येते याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
कार घ्यायची आहे? बाईकच्या किंमतीत खरेदी करा ह्युंदाईची ‘ह्या’ शानदार कार्स
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
मारुतीच्या दोन नवीन कार होणार लॉन्च किंमत आहे फक्त..
मारुती व टाटाला टक्कर द्यायला या कंपनीने आणली स्वस्तातली SUV, किंमत फक्त…