ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू(Hindu) पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Why is Nandi in Kashi facing Gyanvapi Masjid? Know more)
यादरम्यान हिंदू पक्षकारांनी आणखी एक दावा केला आहे. हिंदू पक्षकारांनी नंदीच्या दिशेवरून ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग असल्याचा दावा केला आहे. हिंदू पक्षकारांनी न्यायालयात या संदर्भातील पुरावे सादर केले आहेत. नंदीचे तोंड ज्ञानवापी मशिदीकडे का आहे? असा सवाल देखील हिंदू पक्षकारांनी उपस्थित केला आहे.
शंकराच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे दर्शन घ्यावे लागते. प्रत्येक मंदिरामध्ये नंदीचे तोंड हे शिवलिंगाच्या दिशेला असते. फक्त काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीचे तोंड हे दुसऱ्या दिशेला आहे. काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीच्या तोंडाची दिशा ज्ञानवापी मशीदीकडे आहे, असे हिंदू पक्षकारांनी सांगितले आहे.
हिंदू पक्षकारांनी सादर केलेल्या या पुराव्यामुळे त्यांच्या दाव्याला बळ मिळाले असल्याची सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिरावर आक्रमक केल्यानंतर मंदिराचे बांधकाम उध्वस्थ केले. त्यावेळी औरंगजेबाने मूळ काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग हटवण्याचा प्रयत्न केला.
तसेच नंदी नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्यामध्ये औरंगजेबाला यश आले नाही. त्यामुळे नंदीला काहीच न करता संपूर्ण काशी विश्वनाथ मंदिर उध्वस्थ करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आल्याचा दावा, हिंदू पक्षकारांनी केला आहे. मशिदीच्या तळघराला प्रशासनाकडून कुलूप लावण्यात आल्याचे देखील हिंदू पक्षकारांनी सांगितले आहे.
ज्ञानवापी मशीदीच्या मागे मंदिराचे काही बांधकाम सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. हिंदू पक्षकारांनी न्यायालयात यासंदर्भात काही पुरावे देखील सादर केले आहेत. पण हे पुरावे न्यायालयाकडून ग्राह्य धरले जातील का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ज्ञानवापी मशीद परिसरात गंभीर वातावरण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बाळाची प्लॅनिंग करतोय 8 बायका असलेला ‘हा’ व्यक्ती, प्रथम जी येईल तिला देणार प्राधान्य
मुलगा IPL मध्ये धमाल करतोय आणि आईला माहितच नाही, स्वत:च मुलाखतीत केला खुलासा
प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन जाते, कपडे खेचून काढावे लागतात; अभिनेत्रीने सांगीतले नाट्यक्षेत्रातील विदारक सत्य