‘लगान’ चित्रपटातील गौरी आठवते का? एका चुकीमूळे बॉलीवूड सोडावे लागले होते

१५ जुनला आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला १५ वर्ष पुर्ण झाली आहेत. यावेळी इंडस्ट्रीने आणि प्रेक्षकांनी आमिर खान व चित्रपटाच्या बाकी कलाकारांची आठवण काढली. पण कोणालाही चित्रपटाची मुख्य अभिनेत्री ग्रेसी सिंगची आठवण आली नाही. ग्रेसीने लगान चित्रपटात आमिर खानच्या लेडी लव्हचे काम केले होते.

लगान, मुन्नाभाई एमबीबीएस, गंगाजलसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसणारी ग्रेसी सिंग सध्या चित्रपटांपासून दुर आयूष्य जगत आहे. ती बॉलीवूडमधून पुर्णपणे गायब झाली आहे. ४१ वर्षांची ग्रेसी इंडस्ट्रीपासून पुर्णपणे दुर गेली आहे. त्यामूळे लोकं तिला विसरुन गेले आहेत.

आमिर खान, अजय देवगनसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणारी ग्रेसी सध्या टेलिव्हिजनवर एका धार्मिक मालिकेत देवीची भुमिका साकारत आहेत. ग्रेसीमध्ये टॉपची अभिनेत्री होण्याचे सगळे गुण होते. पण तरीही ती टॉपची अभिनेत्री न बनता खुप कमी वेळात इंडस्ट्रीतून गायब झाली होती.

दिल्लीच्या पंजाबी कुटूंबात जन्मलेली ग्रेसी लहानपणापासूनच कला क्षेत्राकडे आकर्षित होती. ‘अमानत’ मालिकेतून ग्रेसीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. मालिकेतसोबतच ग्रेसीने चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. लगान चित्रपटासाठी ग्रेसीने ऑडिशन दिले होते.

ग्रेसी उत्तम डान्सर होती. त्यामूळे तिला ‘लगान’ चित्रपटात काम मिळाले होते. पहील्याच चित्रपटात आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामूळे ती खुप जास्त घाबरली देखील होती. आमिर खानचे नाव ऐकल्यानंतर ती तिचे डायलॉग विसरुन जायची.

ग्रेसी सिंगचा पहीलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. पहील्या चित्रपटाने रातोरात स्टार बनलेली ग्रेसी बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. आरमान, गंगाजल, मुन्नाभाई एमबीबीएससारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले.

अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असल्यामूळे ग्रेसी खुप जास्त घाबरली होती. तिने बोल्ड आणि इंटीमेट सीन करायला नकार दिला. याच कारणामूळे ती खुप कमी वेळात इंडस्ट्रीतून गायब झाली होती. २००७ मध्ये ग्रेसीने तिच्या करिअरमधील सर्वात मोठी चुक केली.

ग्रेसीने चित्रपटाची स्क्रिप्ट न वाचता चित्रपट साईन केला होता. हा चित्रपट होता कमार आर खानचा ‘देशद्रोही’ या चित्रपटाने ग्रेसीच्या बिघडलेल्या करिअरला संपवून टाकले. ग्रेसीने धोक्यात येऊन हा चित्रपट साईन केला होता. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तिला दुसरा कोणताही चित्रपट मिळाला नाही.

पहील्याच चित्रपटानंतर स्टार झालेली ग्रेसी आत्ता बी ग्रेड चित्रपट करत होती. त्यामूळे तिचे चाहते देखील खुप दुखी होते. त्या काळात करिना कपूर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींमध्ये दिग्दर्शक आणि निर्माते ग्रेसी सिंगला पुर्णपणे विसरुन गेले होते.

२००९ नंतर ग्रेसीला चित्रपटाच्या ऑफर येणे बंद झाले. अनेक वर्ष अभिनयापासून दुर राहिल्यानंतर ग्रेसीने परत एकदा अभिनयात प्रवेश केला. पण यावेळेस चित्रपट नाही तर मालिकेच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला आली. ग्रेसीने टेलिव्हिजनवरुन तिच्या करिअरची सुरुवात केली होती आणि शेवटही टेलिव्हिजनवरच झाला.

‘जय वैष्णवी देवी’ मालिकेत ग्रेसी देवीच्या भुमिकेत दिसली होती. ४१ वर्षांची ग्रेसी सिंग आजही अविवाहीत आणि सिंगल आहे. एवढी वर्ष इंडसट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा ग्रेसीचे नाव कोणत्याही अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही. २०२२ मध्ये लग्न करणार असल्याचे ग्रेसीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
एका चुकीमूळे हिरो बनू शकले नाहीत प्रेम चोप्रा; आजही करतात पश्चाताप
सेटवरील सगळ्या लोकांसमोर मेहमूदने मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती कारण…
संजय दत्तच्या मुलींच्या सवयीला वैतागून सुनील दत्तने सोडले होते घर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.