तज्ञ म्हणतात, तुम्ही घरात असून पण तुम्हाला होऊ शकतो कोरोना; बचावासाठी घ्या ही काळजी

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अशात राज्यात संचारबंदीही जाहीर केली आहे. त्यामुळे कोणालाही आता विनाकारण घराबाहेर पडता येत नाही.

अशात कितीतरी दिवस घराचा उंबरा न ओलांडणाऱ्या लोकांनाही कोरोना होत आहे. सामान्य माणसांचे तर सोडाच सेलिब्रिटींना पण कोरोनाची लागण होतेय. म्हणजेच त्यांच्या घरात सर्व सोईसुविधा असताना घरात राहूनही त्यांना कोरोना होतोय. चला तर मग जाणून घेऊया त्यामागे काय कारण आहे.

कोरोनाचा संसर्ग हा हवेतूनही होत आहे. संक्रमित व्यक्तीच्या नाकातल्या स्त्रावातून जे ड्रॉपलेट्स पडतात, त्यामधून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होत आहे, असे दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळापासून या गोष्टीवर चर्चा सुरु होती. सुरुवातीला ड्रॉपलेट्स थेरीवर भर दिला गेला होता. शिंकण्यातून आणि खोकण्यातून बाहेर आलेले डॉपलेट्स पृष्ठभागावर पडून तिथून इन्फेक्शन पसरत होतं. त्यामुळे सुरुवातीला पृष्ठभाग डिसइन्फेक्ट केले जात होते.

अशात गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, एअरोसोल्स अर्थात पाट मायक्रोनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो, हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात, असे डॉ. गुलेरीया यांनी म्हटले आहे.

त्यामुळे एखादी खोलणारी किंवा शिंकणारी व्यक्ती खोलीत तुमच्यापासून दोन मीटर अंतरावर असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळून गेलात, तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. घरातील वयोवृद्ध माणसे जरी घराबाहेर पडत नसतील. पण घरात जर बाहेरुन येणारी व्यक्ती म्हणजे घरकाम करणारी स्त्री, इलेक्ट्रीशियन, यांमध्ये लक्षणे दिवस नसली तरी ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.

त्यामुळे घरात सुरक्षित अंतर राखणे, शक्य असेल मास्क घालणे ही कामे केली पाहिजे. तसेच स्वच्छता राखणे गरजेचे आहे. घरातील हवा खेळती राहायला हवी याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे घरात जर संसर्ग परसरला असेल तर तो बाहेर जाऊ शकतो, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आम्ही सगळं काही करतो तुम्ही फक्त परवानगी द्या’; भारताच्या मदतीला पाकिस्तान सरसावला
सुजय विखेंची धाडसी मोहीम; नगरसाठी १० हजार रेमडिसीवीर स्वत: खाजगी विमानाने आणल्या
जामखेडच्या डॉक्टरांचा नाद नाय! ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी कोरोना रुग्ण झटपट बरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.