पंख्याला तीन पाती का असतात? जाणून घ्या यामागचे कारण..

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी माणसाने अनेक साधने बनवली आहेत. जसे ती एसी, कुलर आणि पंखा. आता सगळ्यांना माहित आहे की हवामानात बदल झाल्यामुळे आपल्याला उष्णता जाणवते. तुम्ही घरात फॅन किंवा पंखा बघितलाच असेल आणि अनेकवेळा तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंख्याला तीन पाती का असतात? पंख्यामुळे आपल्याला उष्णतेपासून आराम मिळतो.

तर संशोधनानुसार अधिक हवा फेकण्यासाठी केवळ तीन ब्लेड योग्य मानले जातात. भारतात बहुतांश ठिकाणी तुम्हाला ३ पात्यांचे पंखेच पाहायला मिळतील तर दुसऱ्या देशात तुम्हाला पाच पातींचे पंखेही पाहायला मिळतील.

सिलींग फॅनमध्ये एखाद्याने गडबड केली आहे असे कधी होत नाही त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. फॅनचा कमी आवाज यावा आणि चांगली हवा लागावी एवढीच अपेक्षा आपल्याला पंख्याकडून असते. असे मानले जाते की सिलींग फॅनचे ब्लेड जितके कमी असतील तितकीच हवा फेकण्याची क्षमता त्याची जास्त असते.

अधिक ब्लेड असल्यावर पंख्याच्या मोटरवर दबाव येतो आणि त्यामुळे हवा फेकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी याचे डिझाईन वातावरणावर अवलंबून असते. काही देशात आता ४ ब्लेडवाले पंखे आले आहेत. भारतात तीन ब्लेडवाल्या पंख्याचा जास्त वापर होतो.

भारत एक उष्ण देश आहे. कमी ब्लेड असल्यामुळे पंखा जोरात फिरतो आणि आवाजही करत नाही. चार ब्लेडवाल्या पंख्याच्या तुलनेत याला वीज कमी लागते. तसेच सर्वसामान्य लोकांच्या बजेटमध्ये हा फॅन बसतो. आता भारतातही ४ किंवा ५ पातीचे पंखे आले आहेत. पण जास्त लोक ते पंखे वापरत नाहीत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.