आयपीएल २०२२ च्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन खराब राहिले होते. खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ संपूर्ण हंगामात पॉईंट टेबलमध्ये तळाशी राहिला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सने अनेक नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी देखील दिली होती.
१५ वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स या हंगामात पॉईंट टेबलमध्ये तळाशी राहिली आहे. मुंबई इंडियन्सला यावर्षी १४ पैकी फक्त ४ मॅच जिंकता आल्या आहेत. मुंबई इंडियन्सने या हंगामात २४ पैकी २१ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली होती. पण मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी दिली नाही.
मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लिलावामध्ये ३० लाख रूपयांना विकत घेतलं होतं. आयपीएलच्या सात-आठ सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या खेळण्याची चर्चा रंगली होती. मुंबईने त्यांच्या सोशल मिडिया अकांऊटवरून अर्जुन तेंडुलकरचे बॉलिंग करतानाचे व्हिडिओ टाकले होते.
स्थानिक क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघासाठी फक्त दोन सामने खेळले आहेत. मुंबई टी-२० लीगमध्ये ही अर्जुन तेंडुलकर खेळला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यासामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल असे अनेकांना वाटले होते.
टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने अर्जुन तेंडुलकरला न खेळवण्याबाबत उत्तर शोधलं आहे. मोहम्मद कैफ म्हणाला आहे की, “जर MI ला वाटत असेल की अर्जुन तेंडुलकर तयार आहे, तर त्यांनी त्याला आत्तापर्यंत त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला असता. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या खेळावर काम करण्याची गरज आहे.”
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला आहे की, “कर्णधार एखाद्या खेळाडूला शेवटच्या सामन्यापर्यंत का थांबवतो? जर तो खेळाडू चांगला असेल तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.” मोहम्मद कैफच्या म्हणण्याप्रमाणे अर्जुन तेंडुलकर अजून आयपीएलचे दडपण सहन करू शकणार नाही.
महत्वाच्या बातम्याः-
‘फॅन फॉलोईंग वाढावी म्हणून आकाश चोप्रा काहीपण बरळत असतो’; संतापलेल्या पोलार्डचा तडाखा
हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? संरक्षण देता येत नसेल तर त्यांना बंदुका तरी द्या; मनसे आक्रमक
कश्मीरमध्ये रोज हिंदूंच्या हत्या होताहेत, अमित शहांना गृहमंत्री पदावरून काढा अन्…; भाजप नेत्याचा घरचा आहेर