Share

मशिदीजवळ तोडफोड करणारा बुलडोजर मंदिराजवळ येताच का थांबला? लोकांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न

दिल्ली महापालिकेने आज हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. यावेळी जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामे बुलडोझरच्या साहाय्याने हटवण्यात आली आहेत. या कारवाईत अनेक अनधिकृत दुकाने, घरे तोडण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.(Why did the bulldozer stop near the temple? People raised questions on the action of the municipality)

या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) स्थगितीचे आदेश दिले. होते. पण महापालिकेने कारवाई थांबवली नाही. उलट बुलडोझरच्या मदतीने अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत होती. यावेळी मशिदीजवळ देखील बुलडोझर फिरवण्यात आला.

पण मंदिराजवळ पोहचताच कारवाई थांबवण्यात आली. यावर जहांगीरपुरी भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “न्यायालयाचा आदेश ११ वाजताच आला होता. मग त्यानंतरही महापालिकेने कारवाई का सुरू ठेवली? आदेशानंतरही मशिदीजवळ बांधलेल्या दुकानावर बुलडोझरची कारवाई का झाली आणि मंदिराजवळ बुलडोझर पोहोचल्यावर कारवाई का थांबवण्यात आली?”, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सीपीआयएम नेत्या वृंदा करात महापालिकेची कारवाई थांबवण्यासाठी स्वतः घटनास्थळी पोहचल्या होत्या. सीपीआयएम नेत्या वृंदा करात यांनी विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांची भेट घेतली आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. यानंतर जहांगीरपुरी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवण्यात आली.

यासंदर्भात माहिती देताना सीपीआयएम नेत्या वृंदा करात यांनी सांगितले की, “विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांच्याशी बोलणे झाले आहे. आता या परिसरात बुलडोझर चालवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.” आम्हाला न्यायालयाच्या आदेशाची प्रत उशिरा मिळाली, अशी प्रतिक्रिया कारवाईनंतर दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आदेश गुप्ता यांनी यासंदर्भात दिल्ली महानगरपालिकेला पत्र देखील लिहिलं होतं. जहांगीरपुरी भागातील कुशल सिनेमा चौक ते सीडी पार्क झोपडपट्टी बाहेर अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महापालिकेला दिली होती. त्यावर तातडीने पाऊल उचलत दिल्ली महापालिकेने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
…त्यामुळे चड्डीत राहायचं काय समजलं? मनसेची थेट अमोल मिटकरींना धमकी
मी एक हिंदू आहे आणि माझ्यापेक्षाही मोठा कोणी.., दुकानावर बुलडोजर चालवल्यानंतर संतापले दुकानदार
संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now