सुशांत आणि अंकिता वेगळे का झाले? याचाही तपास व्हायला हवा- संजय राऊत

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाचा तपास अजूनही चालूच आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.

सुशांत आणि अंकिता वेगळे का झाले? याचाही तपास झाला पाहिजे. अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच त्यांनी सामनाच्या माध्यमातून अनेक आरोपही केले आहेत.

सुशांतच्या आयुष्यात दोन मुली आल्या होत्या अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती. अंकिताने सुशांतला सोडले होते. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या रियावर अनेक आरोप होत आहेत.

त्यामुळे, अंकिताने सुशांतला का सोडले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही माहिती देखील पब्लिक डोमेनमध्ये असावी, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून बिहार पोलीस आणि केंद्र सरकार मिळून महाराष्ट्र सरकारविरूद्ध कट रचत आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांची दिशाभूल झाली होती, त्यामुळे त्यांनी मुंबईतील घटनेसाठी बिहारमध्ये एफआयआर दाखल केली.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. मात्र बाकीचे लोक कोणत्याही पुराव्याशिवाय त्याची हत्या झाल्याचे सांगत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.