Rohit Sharma : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयामागे एक गंभीर कारण असल्याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात काही मतभेद झाले होते.
गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, ज्यात रोहितचा(Rohit Sharma) संघाबाहेर पडणे हे विशेष ठरले.राहुल द्रविड यांच्या काळात रोहितने भारताचे नेतृत्व करत अनेक सामने जिंकले. मात्र गंभीर यांच्या आगमनानंतर वातावरणात बदल झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितची कामगिरी समाधानकारक नसतानाही, त्याला थेट संघाबाहेर ठेवण्यात आले.
यामुळे रोहित अस्वस्थ झाला आणि तो निर्णय त्याच्यासाठी अपमानास्पद वाटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर रोहितने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अचानक न होता, विचारपूर्वक घेतल्याचे बोलले जात आहे. अनुभवी आणि यशस्वी कर्णधाराच्या अशा शैलीत एक्झिटने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
why-did-rohit-sharma-suddenly-decide-to-retire






