पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे. पण या नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर(Central Government) सातत्याने टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.(Why did people get angry on pm narendra modi)
तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार जवाहर सरकार यांनी नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार जवाहर सरकार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी लिहिले की, “देशाचं राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचा अवमान करण्यात आला आहे.”
“डावीकडे मूळ अशोकस्तंभ आहे, जो की सुंदर, आत्मविश्वासाने उभा आहे. उजवीकडे मोदींनी अनावरण केलेला अशोकस्तंभ आहे, जो की तिरस्कार, अनावश्यकपणे आक्रमक आणि विषय वाटतो”, असे ट्विट तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी केलं आहे. या ट्विटसोबत खासदार जवाहर सरकार यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.
https://twitter.com/jawharsircar/status/1546739489149952000?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546739489149952000%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Ftmc-leaders-jawhar-sircar-attack-on-modi-govt-over-ashokan-lions-rad88
या फोटोमध्ये दोन अशोकस्तंभ दिसत आहेत. या फोटोमध्ये डावीकडील अशोकस्तंभ मूळ आहे. तर उजवीकडील अशोकस्तंभ मोदींनी अनावरण केलेला नवीन अशोकस्तंभ आहे. या ट्विटच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नवीन अशोकस्तंभ तातडीने बदलण्याची मागणी खासदार जवाहर सरकार यांनी केली आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देखील या नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “मी १३० कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांनी “देशद्रोही” बोलावे की नाही?”, असा सवाल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/SanjayAzadSln/status/1546536620316233729?s=20&t=M23D3EtI1cXuxCWKaFRyPw
लेखक, विचारवंत दिलीप मंडल यांनी देखील नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अशोक स्तंभाचे मूळ रूप सारनाथ संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. अशोक स्तंभाची मूळ प्रतिमा टपाल तिकिटांपासून ते सरकारी कागदपत्रांवर आहे. मूळ अशोक स्तंभावर सिंह शांत मुद्रेत आहे. पण पंतप्रधानांनी नवीन संसद भवनात स्थापन केलेल्या अशोक स्तंभावर सिंह रागीट मुद्रेत आहे”, असे लेखक दिलीप मंडल यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
जे पाणी गावकरी पितात तेच पाणी पिण्यास नवनीत राणांनी दिला नकार, म्हणाल्या…
VIDEO: भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल, गंभीर आरोप करत म्हणाली..
मोठी बातमी! महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुखांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा