लवकरच कसबाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. या निवडणूकीसाठी कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. काँग्रेसकडून या निवडणूकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
अर्ज भरताना दोन्ही पक्षांनी शक्तीप्रदर्शनही केले. मुक्ता टिळक या कसबा मतदार संघाच्या आमदार होत्या. पण त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक लावण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे दोन्ही पक्षांत आता लढत पाहायला मिळणार आहे.
भाजपकडून हेमंत रासने यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच काँग्रेसनंतर आता संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी आणि ब्राम्हण महासंघ सुद्धा या निवडणूकीसाठी आपआपला उमेदवार देणार आहे. पण या निवडणूकीत सर्वात जास्त चर्चा भाजपच्या उमेदवाराची होत आहे.
भाजपने कसबा निवडणूकीत हेमंत रासने यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण ते ब्राम्हण नाही, त्यामुळे पुण्यात अनेक पाट्या सुद्धा पाहयला मिळाल्या. आता भाजपला मत द्यायचं की नाही? असे प्रश्न पुणेकर विचारताना दिसून आले. पण त्याचे खरे कारण आता समोर आले आहे.
कसबा विधानसभा मतदार संघात बघितलं तर ओबीसी मराठा आणि मुस्लिम लोकांच्या मतांची टक्केवारी ६६ टक्के आहे. त्यामुळे भाजपने याचाच विचार करत ओबीसी उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघाचं नेतृत्व ब्राम्हण समाजाकडे होतं.
ही निवडणूक बिनविरोध होईल असे म्हटले जात होते. पण काँग्रेसने अचानक अर्ज भरल्यामुळे आता भाजपला सुद्धा लढत द्यावी लागणार आहे. काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. धंगेकर यांचा जनसंपर्क खुप चांगला आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुलांना वाचवण्यासाठी स्वत: आगीत होरपळत राहिला बाप, नाशिकमधील घटना ऐकून अंगावर येईल काटा
आईला ५०० वर्षे जीवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली भन्नाट शक्कल, वाचून कराल कौतूक
चिनी गुप्तहेराचे यान पाडणार होते बाइडेन; पण ‘या’ कारणामुळे महासत्ता अमेरिकाही आली शरण