‘या’ पाच महत्वाच्या कारणांमुळे १८ दिवस झाले तरी आर्यन खानला भेटत नाहीये जामीन

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्स प्रकरणात अटक करुन १३ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. असे असले तरी आजही त्याचा पुन्हा एकदा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे शाहरुख खानची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

आता १३ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतानाही आर्यन खानला जामीन का मिळत नाहीये? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणे समोर आली आहे, ज्यामुळे त्याला जामीन मिळत नाहीये.

१. आर्यन रेग्युलर कस्टमर- आर्यन खानविरोधात एनसीबीला पक्के पुरावे सापडले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी काही कारणे एनसीबीने कोर्टापुढे मांडली आहे. त्यापैकी एक म्हणजे तो नियमित ग्राहक होता, तसेच तो नियमित ड्रग्स घेत होता.

२. व्हॉट्सऍप चॅट- ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एसबीनीने चौकशी करण्यासाठी त्याचा मोबाईल जप्त केला होता. त्याच्या मोबाईलमधले ड्रग्स संबंधी चर्चा करतानाचे व्हॉट्सऍच चॅट एससीबीच्या हाती लागले होते. त्यामुळेही त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

३. आंतरराष्ट्रीय कनेक्शन- आर्यन खानचे ड्रग्स पेलर्डसोबत कनेक्शन असल्यादा दावा एनसीबीने कोर्टात केला आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचं एनसीबीने म्हटले आहे.

४. पुरावा नष्ट करण्याची भिती- आर्यन खानचे आंतराष्ट्रीय ड्रग्स पेलर्डसोबत संबंध आहे. त्यामुळे तो जामीन मिळाल्यानंतर ते पुरावे नष्ट करु शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, असे एनसीबीने म्हटले आहे.

५. संपुर्ण कटात सहभाग- आर्यन खानचा आणखी तपास करण्यासाठी एनसीबीने त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळेच आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-
“शाहरुखने भाजपमध्ये प्रवेश केला तरच त्याच्या मुलाला जामीन मिळेल, सोबत देशभक्तीचे प्रमाणपत्रही मिळेल”
या ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करतात राकेश झुनझुनवाला; मिळतो तब्बल २५१ टक्क्यांहून जास्त परतावा
मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला, वेब सिरीज पाहून बापाच्या खुनाचा प्लॅन आखला; वाचा डाॅ. राजन शिंदेंच्या खुनाची कहाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.