अर्णब गोस्वामी यांना अटक झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरातून अटक केली.

या आटकेनंतर अनेकांना हा प्रश्न पडला असेल की नक्की हे प्रकरण आहे तरी काय? आज अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर पुन्हा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत राहणारे ५२ वर्षीय इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ ला अलिबागच्या कावीर येथे आत्महत्या केली.

या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. अर्णब आणि अन्य दोघांनी अन्वय यांचे पैसे थकवल्याने ते नैराश्यात होते.

धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी अन्वय यांच्या ७३ वर्षीय आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता. अन्वय हे मुंबईत कॉनकर्ड डिझाइन्स लिमिटेड या नावाने अंतर्गत वास्तुरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी ते कावीर येथील आपल्या घरी आले होते.

तेथील दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. त्याचठिकानी पोलीसांना त्यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

या चिट्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने मी आत्महत्या करत आहे असं त्या चिठीत लिहिले होते.

या आत्महत्येनंतर नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वामींसह बाकीच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.