तू नेहमी गरोदर का असतेस? ट्रोलरच्या आगळ्यावेगळ्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर, म्हणाली..

मुंबई । बॉलीवूड मधील अनेक कलाकार हे त्यांच्या अनेक गोष्टींमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. कोणी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल ट्रोल होत असत, तर कोणी त्यांच्या कलाविश्वातील अभिनयामुळे, लूकमुळे ट्रोल होत. अशातच अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन ही सध्या जोरदार ट्रोल होत असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. तिने अलीकडेच सोशल मीडियावर जाहीर केले होते की, लिसा जूनमध्ये एका बाळाला जन्म देईल. लिसा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि तिने तिचा बेबी बंपमधील अनेक ग्लॅमरस फोटो देखील शेअर केले आहेत.

अशातच तिने पुन्हा बेबी बंपमधील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी लिसा हेडन हीने गरोदर असताना बिकिनीमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. तसेच, या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिसाला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला.

मात्र लिसाने या युजरला हटके उत्तर देताच युजरची बोलती बंद झाली आणि तिने लिसाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने लिसाला तू कायमच गरोदर असतेस! तुला सतत गरोदर राहणे आवडते का? असा अजब प्रश्न विचारला लिसाने या कमेंटला उत्तर दिले,’हो मला आवडतं..

ही खूप खास वेळ आहे. मात्र आता अजून नाही. आता बाळाला जन्म दिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याकडे लक्ष देणार आहे.’ लिसाच्या या उत्तरावर त्या युजरने रिप्लाय दिला,’तुझ्याकडून हे ऐकून खूप मस्त वाटलं लिसा. तुझी फिगर आकर्षक आहे. गरोदरपणातील तुझे फोटो मला खूप आवडतात. तुला शुभेच्छा. काळजी घे आणि सुरक्षित रहा’.जून महिन्यातच लिसाची प्रसूती होणार असल्याचं तिने नुकतच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.

लिसाने ‘आयेशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती वो ‘हाउसफुल 3’, द शौकीन्स, रास्कल्स, क्वीन, ऐ दिल है मुश्किल या सारख्या अनेक चित्रपटात ती झळकली. त्यानंतर लिसाने 2016 साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होते. 2017 मध्ये तिने तिच्या पहिल्या मुलाला म्हणजेच जॅकला जन्म दिला. तर 2020 मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

महत्वाच्या बातम्या
कंगना लुटतेय पावसात घोडेस्वारीचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड
‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवीन वळण; आसावरीला कळणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याविषयी? 
जेनेलियासोबत रोमान्स करता करता रितेशने केला दुसऱ्याच कोणाला किस; पहा पुढे काय घडलं..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.