अमृता सिंग गेल्या पंधरा वर्षांपासून आहे सिंगल; जाणून घ्या कारण

बॉलीवूडच्या स्ट्रॉंग सिंगल मदर्सबदद्ल बोलले गेले तरी त्या यादीर सर्वात पहीले नाव सैफ अली खानची बेगम अमृता सिंगचे येते. लग्नाच्या चौदा वर्षांनंतर अमृता आणि सैफने घटस्फोट घेतला होता. दोघांनी वैयक्तिक कारणामूळे घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर मुलांची सगळी जबाबदारी अमृतावर आली होती.

२००४ मध्ये अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला होता. दोघांच्या घटस्फोटोला पंधरा वर्ष झाली आहेत. घटस्फोटानंतर सैफ त्याच्या आयूष्यात पुढे निघून गेला. त्याने करिना कपूरसोबत दुसरे लग्न केले. आत्ता तो चौथ्यांदा वडील बनणार आहे. पण अमृता सिंग मात्र गेल्या पंधऱ्या वर्षांपासून सिंगल आहे.

सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी अमृता तिच्या लव्ह अफेअर्समूळे खुप जास्त चर्चेत होती. बारा वर्ष छोट्या सैफशी लग्न करणाऱ्या अमृताचे त्याच्या अगोदर सनी देओल, रवी शास्त्री आणि विनोद खन्नासोबत अफेअर होते. तिच्या या प्रेमप्रकरणांची खुप जास्त चर्चा झाली होती.

सनी देओल – १९८३ मध्ये ‘बेताब’ चित्रटातून अमृता सिंगने सनी देओलसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट खुप हिट झाला होता. चित्रपटातील गाण्यांनी आणि सनी अमृताच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

मोठ्या पडद्यासोबतच खऱ्या आयूष्यात देखील अमृता आणि सनी देओलची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण दोघांच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. म्हणून शेवटी दोघांचे ब्रेकअप झाले. दोघांनी परत एकत्र काम केले नाही.

रवी शास्त्री – सनी देओलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृताच्या आयूष्यात क्रिकेटर रवी शास्त्रीची एन्ट्री झाली. दोघेही एकमेकांवर प्रेम करु लागले होते. १९८६ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. पण साखरपुड्यानंतर दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

विनोद खन्ना – अमृता सिंग आणि विनोद खन्नाच्या अफेअरच्या खुप जास्त चर्चा झाल्या होत्या, दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण त्यांचे प्रेम पुढे जाऊ शकले नाही. चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाचा आनंद झाला. या अफेअरच्या देखील खुप जास्त बातम्या बनल्या होत्या.

प्रेमात अनेक वेळा फसलेल्या अमृताने बारा वर्ष छोट्या सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अमृता सिंगल आहे.

महत्वा्या बातम्या –

पहा मराठमोळ्या अलका कुबलच्या नवऱ्याचे फोटो; आहे प्रसिद्ध फोटोग्राफर

‘या’ अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा; शेअर केले बाथरुममधले फोटो

लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर प्रियंका चोप्राला व्हायचे आहे आई; पण…

एकाच घरातील सुना असत्या जान्हवी आणि सारा; पण श्रीदेवीमूळे होऊ शकले नाही दोघींचे लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.