अभिषेक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले? अभिषेक म्हणतो..

फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक हिट जोड्या आहेत. फिल्मी पद्यासोबतच खऱ्या आयुष्यातील जोड्या देखील प्रेक्षकांना खुप जास्त आवडतात. म्हणून बॉलीवूडचे अनेक कपल्स स्टार कपल म्हणून ओळखले जातात.

असेच एक स्टार कपल बच्चन कुटुंबात देखील आहे. एक नाही बच्चन कुटुंबात दोन स्टार कपल आहेत. पहिलं म्हणजे अमिताभ आणि जया बच्चन दुसरे म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन. या दोन्ही जोड्यांचे करोडो चाहते आहेत.

खास करून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचे. दोघांना इंडस्ट्रीतील पावर कपल म्हणून ओळखले जाते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. चित्रपटाच्या स्टोरीप्रमाणेच दोघांची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी रंजक आहे.

२० एप्रिल २००७ ला ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्न केले होते. लग्नानंतर दोघांच्या जोडीला अनेकांनी पसंत केले तर अनेकांनी या जोडीला नाव ठेवली. कारण ऐश्वर्या बॉलीवूडची सुपरस्टार आहे तर अभिषेक अजूनही त्याच्या करिअरमध्ये चांगले काम करू शकला नाही.

याच कारणावरून अनेक वेळा सोशल मीडियावर दोघांच्या जोडीला ट्रोल केले जाते. लोकांचे म्हणणे आहे की, अभिषेक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे त्यामुळे ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्याकडे बघून अभिषेकने तिच्याशी लग्न केले आहे.

अभिषेकने असे बोलणाऱ्या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, लोकं विचार न करता काहीही बोलत असतात. त्यामुळे कधी कधी नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो.

अभिषेक म्हणाला की, ‘लोकांना वाटते की मी अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने माझ्याशी लग्न केले आहे. पण त्यात काही सत्य नाही. आम्ही दोघे एकमेकांना आवडलो आणि प्रेमात पडलो. त्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’.

दुसरा मुद्दा म्हणजे ऐश्वर्या जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केले नाही. माझे तिच्यावर प्रेम आहे म्हणून लग्न केले. तिने माझ्याशी लग्न केले यासाठी मी स्वतः ला खुप नशीबवान समजतो.

महत्त्वाच्या बातम्या –

दया भाभीने सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा; म्हणाली…

उर्मिला मातोंडकरमुळे झालता राम गोपाल वर्माचा घटस्फोट; बायकोने उर्मिलाच्या कानाखाली वाजवली होती

दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.