‘नारी सन्मान’ च्या एका कार्यक्रमात बोलताना शिवराज सिंग चौहान यांनी मुलींच्या लग्नाच वय १८ ऐवजी २१ केले पाहिजे असे म्हटले होते. यावर कॉंग्रेसकडून टिका होत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी “मुलगी जर वयाच्या १५ व्या वर्षीही प्रजननक्षम असते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय?” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
“१५ वर्षांची मुलगीदेखील प्रजननक्षम असते असं डॉक्टर सांगतात. तर मग मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्याची काय गरज आहे. शिवराज सिंग मोठे डॉक्टर झाले आहेत का?” असे सज्जन सिंह म्हणाले. तसेच सज्जन सिंह यांनी भाजप सरकार मुलींची सुरक्षा करण्यात असमर्थ असल्याचा आरोप केला आहे.
“अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री ढोंगीपणाचं राजकारण करत आहेत,” असे सज्जन सिंह म्हणाले आहे.
भाजपाने सज्जन सिंह यांच्या वक्तव्यावर टीका केली असून हा देशातील मुलींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. “आपल्या पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत हे ते विसरलेत का? प्रियंका गांधीदेखील एक महिला आहेत. माझी सोनिया गांधींना विनंती आहे की त्यांनी सज्जन सिंह यांना जाहीर माफी मागण्यास सांगावी आणि पक्षातून हाकलून द्यावं,” अशी मागणी भाजपा नेत्या नेहा बग्गा यांनी केली आहे.
पत्नीला मिठी मारून लोकलमधुन दिले ढकलून; मुंबईतील धक्कादायक घटना
“राजकारण एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो”
जाणून घ्या कुठे गायब झाली सलमान खानची ‘सनम बेफवा’ चित्रपटातील अभिनेत्री चांदनी