कोरोना लस बाजारात आल्यानंतर सर्वात आधी कोणाला मिळणार?; जाणून घ्या…

दिल्ली । भारतासह जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. यामुळे सर्वांचे लक्ष हे कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे.

ऑगस्टमध्ये कोरोनाचे भारतात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. हर्ड इम्युनिटी आणि कोरोना लस हेच कोरोनाला रोखण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत.

त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचे याबद्दलचे धोरण वेगवेगळे असणार आहे.

भारतासारख्या मोठ्या देशात नागरिकांना कोरोनावरील लस देणे अतिशय मोठे आव्हान असेल. त्यात बराच मोठा अवधी जाईल. त्यामुळे सर्वात आधी कोरोना लस कोणाला द्यायची हा प्रश्न आहे.

त्यात कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पालिकेतील कामगार आणि पोलिसांना प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाशी झुंज देणारी आघाडीची फळी सुरक्षित असणे गरजेचे असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात येऊ शकते. यासोबतच कोरोनाचा सर्वात धोका वृद्धांनादेखील आहे त्यांना देखील प्राधान्य मिळू शकेल.

मात्र त्यासाठी कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स तर होत नाहीत ना, हे विचारात घेतले जाईल. अनेक देश हे कोरोना लसीची ट्रायल घेत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.