कोण होती पुजा चव्हाण, जिच्या आत्म.हत्येमुळे शिवसेनेचा मंत्री सापडलायं वादाच्या भोवऱ्यात

पुण्यातील वानवडी परिसरातील हेवन पार्क इमारतीत राहणाऱ्या २३ वर्षीय पुजा चव्हाण या तरूणीने ८ फेब्रूवारीच्या पहाटे इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली. ही तरूणी काही दिवसांपुर्वीच क्लासेससाठी पुण्यात आली होती. तिच्या आत्म्ह.त्येमुळे राजकीय वर्तूळात खळबळ माजली आहे. तिच्या आत्महत्येचा संबंध शिवसेनेच्या मोठ्या मंत्र्यासोबत आहे असं बोललं जात आहे.

पुजा चव्हाण या २३ वर्षीय तरूणीला टिकटॉक स्टार म्हणून ओळखले जायचे. तिचा चाहतावर्ग ही मोठा होता. अनेक जणांना तिच्या सारखं व्हावसं वाटायचं. बीड जिल्ह्यातील परळी शहरात वसंतनगर परिसरात आईवडिल आणि बहीणीसोबत राहायची. इंग्रजी शिकण्यासाठी तिने पुण्याची वाट धरली. अगदी कमी वयातच सामाजिक कार्यात ती सक्रीय झाली होती. बोलण्यातलं धाडस, जिद्द, उच्च राहणीमान यामुळे संपुर्ण राज्यात तिला टिकटॉकच्या माध्यमातून ओळखले जायचे.

सोशल मिडियावर पुजा चव्हाण नेहमी सक्रीय असायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असायचा. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट प्रेरणादायी असायच्या. नववर्षाच्या सुरूवातीला तिने मनात खुप काही इच्छा असल्याची पोस्ट शेअर केली होती त्यात तिने भरलेली खाती, समृध्द नाती आणि सुखी आयुष्य…सगळं २०२१ मध्ये हवंय…चला सूरूवात करूया…!

 

त्यानंतर १ महिन्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदीरासमोरील फोटो तिने शेअर केला होता त्यात तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता. सर्वांना जगण्याची प्रेरणा देणाऱ्या पुजाने आ.त्मह.त्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने तिला हा निर्णय का घ्यावा लागला? तिच्या आत्मह.त्येचं खरं कारण समोर येणं गरजेचं आहे.

 

दरम्यान तिच्या आत्मह.त्येमागे शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड असल्याचं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. यामध्ये या मंत्र्याच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय निष्पन्न होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात सेनेच्या मंत्र्याचे कनेक्शन उघड? ‘ती’ क्लिप व्हायरल
“वाट कसली बघताय? मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
भाजपाची रणरागिणी कडाडली, “वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.