रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जुनला त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले आहेत. बॉलीवूडची खरी काळी बाजू लोकांसमोर येत आहे. म्हणून अनेकजण भडकले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. नेपोटिझमचा मुद्दा देखील खुप जास्त चर्चेत आहे. तर ड्रग्जचे प्रकरण देखील गाजत आहे. या सर्व प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर लोकांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. तर सुशांतच्या कुटूंबियांनी देखील रियाला सुशांतच्या मृत्यूसाठी जिम्मेदार ठरवले आहे. म्हणून हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशांतच्या घरच्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सोशल मीडीया आणि माध्यामांनी देखील रियाबद्दल अनेक अफवा पसरवल्या आहेत. अनेक माध्यामांनी रियावर आरोप करत तिला गुन्हेगार ठरवले आहे. पण आत्ता मात्र रियाच्या वकीलांनी रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना चेतावणी दिली आहे.

रियाचे वकील सतीश माने यांनी रियाबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्यांची एक यादी सीबीआयकडे दिली आहे. त्या यादीत नाव असणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. या यादीत सर्वात पहीले नाव रियाची शेजारीन डिंपल थवानीचे आहे.

डिंपलने दावा केला होती, सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर म्हणजे १३ जुनला सुशांत रियाला सोडण्यासाठी घरी आला होता. पण एनसीबीच्या चौकशीत डिंपल आपल्या दाव्यावरुन पलटली. त्यानंतर रियाने डिंपल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

सुशांत प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीने केला खुलासा; दाखवली बाॅलीवूडची काळी बाजू

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंगनाला भिडला शेतकरी; चांगलाच उतरवला माज

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.