कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी चीनला जाणार डब्ल्यूएचओची एक टीम

 

बीजिंग | जगभरात कोरोनाचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. यातच आता डब्ल्यूएचओची एक टीम चीनला जाऊन कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेणार आहे.

चीन सरकारने यासाठी आज डब्ल्यूएचओला परवानगी दिली आहे. चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

चीनने कोरोना व्हायरसची माहिती देण्यासाठी उशीर केल्यामुळे बघता बघता संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस पसरला. डब्ल्यूएचओची टीम पुढील आठवड्यात चीनला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध अतिशय गहन पद्धतीने करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.