जागतिक आरोग्य संघटनेची दिलासादायक माहिती, कोरोना महामारी संपण्याचे दिले संकेत

नवी दिल्ली । कोरोनाचे संकट आपल्यावर अजूनही असले तरी आता त्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. प्रभाव कमी झाला असला तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोना लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी एक वक्तव्य केले आहे. कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नसल्याचे टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.

यामुळे ही एक मोठी बाब आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व जग या आजारीशी लढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या काळात आपण माणसांची चांगली रूप पाहिली आहेत. त्यासोबत त्यांची वाईट रूपही आपण पाहिली आहेत.

अनेकांचा मृत्यू यामध्ये झाला. तसेच मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. महामारी संपत आली पण काही गरीबी, भूक आणि असमानतेमध्ये परिवर्तन झाले नसल्याचे टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.

प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये, असेही टेंड्रोस म्हणाले. लसींवर देखील अनेक देशात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी जी परिस्थिती होती ती सध्या नाही, परिस्थिती हळूहळू सुधारत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.