भारतात का झाला कोरोनाचा उद्रेक? WHO च्या टॉपच्या सायंटिस्टने सांगितली ‘ही’ कारणे

भारतात कोरोनाचा मोठा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. आता दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहेत. तसेच ४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु होत आहे. भारतात पसरत चाललेल्या कोरोनाच्या मागे काय कारणे आहेत? याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या टॉपच्या संशोधक डॉ. सौम्या सामीनाथन यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले आहे की, भारतात अचानक कोरोनाचा उद्रेक होण्याच्या मागे कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे जो खुप पावरफुल आणि घातक आहे. तसेच लसीकरणाचा वेग कमी असल्याचेही त्यांनी कारण सांगितले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारतात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती हे दाखवते की कोरोनाचा नवा स्ट्रेन खुप जलद पद्धतीने पसरत आहे.

यावर फक्त जलद पद्धतीने लसीकरण करणे हा एकच उपाय आहे असे त्या म्हणाल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी, भारतात मागील चार दिवसांपासून दररोज चार लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे दिल्लीपासून ते युपीपर्यंत हॉस्पिटलमध्ये बेड्स, ऑक्सीजन आणि औषधांची कमतरता भासत आहे.

भारताची हेल्थ सिस्टीम मोडकळीस आली आहे. आणि अनेक तज्ञांनी कोरोनामुळे होणाऱ्या रूग्णांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की कोरोनाच्या नवीन व्हेरीएंट B.1.617 जो भारतात ऑक्टोबर महिन्यात मिळाला होता तोच या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहे.

हा व्हेरीएंट इतका खतरनाक आहे की तो शरीरातील ऍन्टीबॉडी बनवण्याची क्षमता रोखण्याचे काम करत आहे. जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत हा खुप जलद पद्धतीने म्यूटेट करत आहे. ब्रिटेन आणि अमेरिकेनेही या व्हेरीएंटला खुप गंभीर मानले आहे.

त्यांनी भारतातील लोक खुप निष्काळजी आहेत त्यामुळे हा विस्फोट झाला आहे असे सांगितले आहे. मोठ्या संख्येने गर्दी करणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे ही महत्वाची कारणे आहेत. डॉ. स्वामीनाथ यांच्या मते यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अन्य मोठ्या नेत्यांनी घेतलेल्या रॅलींमुळेही कोरोनाचा मोठा प्रसार झाल्याचे सांगितले आहे.

रॅलीमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार झाला असल्याच्या त्यांनी सांगितले. भारतातील अनेक लोकांना वाटत आहे की संकट दूर झाले आहे पण ही खुप मोठी चूक आहे. अनेक लोकांनी मास्क घालणे सोडून दिले आहे आणि कोरोनापासून वाचण्याचे उपाय करणे सोडून दिले आहे त्यामुळे कोरोना सहज पसरत आहे.

आतापर्यंत फक्त २ टक्के भारतात लसीकरण पुर्ण झाले आहे. त्यांनी सांगितले की भारताला ७० ते ८० टक्के लसीकरण करण्यासाठी वर्ष किंवा कितीतरी महिने लागू शकतात. लसीकरण करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या
कोरोना काळात ७ लाख रुपये देऊन बोलवली कॉलगर्ल अन् कोरोनामुळे झाला तिचा मृत्यु
बोल्ड व शाॅर्ट कपड्यांवर रश्मी देसाईचा भन्नाट डान्स पाहून चाहते घायाळ; पहा व्हिडीओ
सुनील शेट्टी पेक्षाही श्रीमंत आहे त्यांची पत्नी मोना शेट्टी; करते ‘हा’ व्यवसाय
कोरोनाचा हाहाकार! कोरोनामुळे पतीच्या मृत्युनंतर पत्नीने नवव्या मजल्यावरुन उडी मारत जीवन यात्रा संपवली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.