कोरोना कधी संपणार ? जागतिक आरोग्य संघटनेने सांगितली वेळ..

मुंबई | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग बदलेल आहे. या विषाणूचा प्रसार कधी थांबणार ? कोरोनाची लस कधी येणार ? कोरोनाचे हे संकट कधी दूर होणार ? असे अनेक प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटना, म्हणजेच WHOने अंदाजाच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोरोना रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आशा आहे की यामुळे फरक पडेल.

तसेच, लस विकसित झाल्यास मोठी मदत होईल. हे सर्व वेळेवर झाल्यास, तर दोन वर्षात आपण कोरोना रोखू शकू,’ असं सांगितले आहे.

दरम्यान, ‘कोरोना आणि एच 1 एन 1 पॅटर्न एकसारखे दिसत नाहीत. स्पॅनिश फ्लू तीन लहरींमध्ये आला. त्याची दुसरी लाट सर्वात धोकादायक होती. सामान्यत: उर्वरित विषाणूच्या बाबतीतही हेच दिसून येते.

काही धोकादायक लाटा नंतर, महामारी विषाणू देखील हंगामी व्हायरस बनतात आणि काही काळ वेगवेगळ्या वेळी उद्भवतात. पण आशा आहे की कोरोनाला एवढी लाट मिळणार नाही,’ असं मत WHOचे आपत्कालीन प्रमुख मायकल रायन यांनी मांडले.

तसेच देशात कोरोना विषाणूचं संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे.

मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.