Amitabh Bachchan : सर्वांना माहीती आहे की, बॉलीवूडमध्ये नाव कमवणे एवढे सोपे नाही. इथे यश मिळवण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते. त्याशिवाय त्यांना यश मिळत नाही. या गोष्टीचा अनूभव महानायक अमिताभ बच्चनला देखील आला आहे.
ज्यावेळी अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना कोणीही ओळखत नव्हते. ते बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी इंदिरा गांधीचे पत्र घेऊन आले होते. पण त्याचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. त्यांना चित्रपट मिळत नव्हते.
या काळात त्यांची भेट अभिनेते मेहमूदचे भाऊ अनवर अलीसोबत झाली. अनवर यांनी मेहमूदला सांगितले की, हा प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चनचा मुलगा आहे. त्यावेळी मेहमूदने अमिताभची मदत केली. त्यांनी अमिताभला ‘बोम्बे टु गोवा’ चित्रपटामध्ये कास्ट केले.
हा अमिताभच्या करिअरसाठी महत्वाचा टप्पा होता. त्यांनी मेहमूदच्या घरी राहून पहील्या चित्रपटाची शुटींग पुर्ण केली होती. बोम्बे टू गोवा चित्रपट पाहील्यानंतरच प्रकाश मेहराने त्यांना ‘जंजिर’ चित्रपटासाठी कास्ट केले होते. जंजिर चित्रपटाने अमिताभला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते.
अमिताभला इंडस्ट्रीमध्ये एवढे काम मेहमूदमूळे मिळाले होते. ज्या व्यक्तिने अमिताभ बच्चनची एवढी मदत केली. तोच व्यक्ति त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये विश्वासघाती बोलला होता. जाणून घेऊया मेहमूद अमिताभला विश्वासघाती का बोलले होते?
करिअरच्या सुरुवातीला अमिताभ मेहमूदला दुसरे वडील बोलायचे. एका वडीलांनी मला जन्म देऊन सांभाळ केला. तर दुसरे वडील मेहमूद यांनी मला इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांच्यामूळेच अमिताभ सुपरस्टार झाले होते.
सुरुवातीला अमिताभ मेहमूदचा खुप जास्त सम्मान करत होते. पण स्टारडम मिळाल्यानंतर मात्र ते मेहमूदला विसरुन गेले होते. त्यांनी मेहमूद यांना महत्व देणे बंद केले. एवढेच नाही तर त्यांनी मेहमूदला भेटणे देखील बंद केले होते.
अमिताभचे हे वागणे त्यांना समजत नव्हते. मेहमूद त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी देखील अमिताभ त्यांना भेटायला गेले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये मेहमूद होते. त्याच हॉस्पिटलमध्ये अमिताभच्या वडीलांवर उपचार सुरु होते. पण तरीही ते मेहमूदला भेटायला गेले नाहीत.
त्यामूळे मेहमूद खुप दुखी झाले होते. त्यांना अमिताभचा राग आला होता. पण ते त्यांच्यावर चिडू शकत नव्हते. कारण अमिताभ त्यांना वडील मानत होते. मेहमूदने त्यांच्या शेवटच्या मुलाखतीमध्ये अमिताभवरचा हा राग सांगितला होता.
मेहमूद म्हणाले होते की, ‘अमिताभ मला वडील समजत होते. स्टारडम मिळाल्यानंतर ते मला विसरुन गेले होते. म्हणून मी अमिताभला कृतघ्न समजतो. ते मला वडील मानत होते म्हणून मी त्यांना काही वाईटही बोलू शकत नाही. मी फक्त एवढेच म्हणेल की, अमिताभने जे माझ्यासोबत केले. ते दुसरं कोणासोबत व्हायला नको’.
महत्वाच्या बातम्या
झोपून खा नायतर लोळून! फक्त शेतीचा नाद पाहिजे; पठ्या वर्षाला कमावतो तब्बल दिड कोटी नफा; जाणून घ्या कसं?
ajay devgan : दृश्यम २ च्या छप्पर फाड कमाईनंतर अजय पोहचला काशी विश्वनाथ मंदिरात; म्हणाला, हर हर महादेव
सतत फ्लॉप रिषभ पंतला पुन्हा संधी, मात्र चांगल्या धावा करूनही संजू सॅमसनला ठेवले संघाबाहेर