Share

सिद्धू मुसेवालाची हत्या कोणी केली? काय होते नेमके कारण? पोलिसांनी शोधलं कॅंनडा कनेक्शन

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली आहे. मानसाचे एसएसपी (SSP) गौरव तुरा यांनी हत्येसंदर्भात  मोठा खुलासा केला आहे. कॅनडामधील गॅगस्टर गोल्डी बरारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे असे, तुरा यांनी म्हटलं आहे.

सिद्धू  मुसेवालाने बुलेटप्रुफ गाडी नेली नव्हती. ३ गाड्यांनी सिद्धू मुसेवालाची थार थांबवली होती. सिद्धू मुसेवाला सोबत कोणी अंगरक्षक नव्हते असे SSP तुरा यांनी सांगितले आहे. सिद्धू मुसेवालावर ९ एमएम पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला आहे.

सिद्धू  मुसेवालावर गोळीबार करण्यात आलेला त्यावेळी  सिद्धू  मुसेवाला स्वत: ड्रायव्हींग करत होता. लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल गॅगवॉरमुळे मूसवालची हत्या झाली आहे.  लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. शार्प शूटर सज्जन सिंग उर्फ भोलू, अनिल कुमार उर्फ लठ आणि अजय कुमार उर्फ सनी कौशल अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

पोलिसांनी या तीन हल्लेखोरांना तिहाक करारगृहातून रिमांडवर घेतले आहे. तीन हल्लेखोरांनी चौकशीदरम्यान प्रसिध्द गायकाच्या मॅनेजरच्या हत्याकांडात सहभागी असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो पंजाबी सिद्धू मुसेवालाच आहे असा पोलिसांना संशय आहे.

विक्की मद्दुखेडा गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी  लॉरेन्स बिश्नोईने गुंडाच्या करवी सिध्दू मुसेवीलाची हत्या केलेली असू शकते, असा पंजाब पोलिसांना संशय आला आहे. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी हा लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत, दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा, ऑपेट करतो.

महत्वाच्या बातम्या:-
ना ओटीपी आला, ना मेसेज, तरी पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून गायब झाले ३१ लाख, वाचा काय घडलं…
या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या
गुजरात जिंकल्यानंतर सोशल मिडीयावर मोदी आणि अमित शहांचे ‘ते’ फोटो व्हायरल, फिक्सिंग केल्याचा होतोय आरोप

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now