Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांचे चाहते अनेक प्रकारांनी आपली निष्ठा व्यक्त करत असतात. असाच एक किस्सा समोर आला आहे हरियाणातील कैथल जिल्ह्यातून, जिथे रामपाल कश्यप(Rampal Kashyap,) नावाच्या व्यक्तीने गेल्या 14 वर्षांपासून बूट न घालण्याचा संकल्प केला होता – तोपर्यंत जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि त्यांना प्रत्यक्ष भेटत नाहीत.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, मात्र रामपाल कश्यप यांना त्यांची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य झाले नव्हते. तरीही त्यांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही आणि अनवाणी चालणे सुरूच ठेवले. अखेर, 14 वर्षांनी ही प्रतीक्षा संपली. आंबेडकर जयंतीनिमित्त हरियाणा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी(Narendra Modi) यांची सोमवारी यमुनानगर येथे रामपाल कश्यप यांच्याशी भेट झाली.
या भेटीदरम्यान भावनिक क्षण पाहायला मिळाला. पंतप्रधान मोदींनी(Narendra Modi) रामपाल कश्यप(Rampal Kashyap,) यांना बूटांची नवीन जोडी भेट दिली आणि स्वतः त्यांच्या पायात ते बूट घालून दिले. पंतप्रधानांनी या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “आज मला कैथल येथील रामपाल कश्यप जी यांना भेटण्याचे भाग्य लाभले. त्यांनी 14 वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की ‘मोदी पंतप्रधान होईपर्यंत आणि त्यांना भेटेपर्यंत मी बूट घालणार नाही.’ आज मला त्यांना बूट घालण्याची संधी मिळाली.”
रामपाल कश्यप हे कैथल जिल्ह्यातील खेडी गुलाम अली गावचे रहिवासी असून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. ते सध्या 55 वर्षांचे असून पूर्वी विभागीय अध्यक्ष राहिले आहेत. व्यवसायाने मजूर असलेले कश्यप हे भाजपच्या शक्ती केंद्राचे प्रमुखही आहेत.
या भावनिक भेटीमागे माजी भाजप आमदार कुलवंत राम बाजीगर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना(Narendra Modi) पत्र पाठवून रामपाल कश्यपच्या प्रतीक्षेबद्दल माहिती दिली होती. पीएमओने या पत्राची दखल घेतल्यानंतर कश्यप यांना यमुनानगर येथील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.
हा संपूर्ण प्रसंग केवळ एक चाहत्याची निष्ठा दाखवणारा नाही, तर नेत्या आणि सामान्य कार्यकर्त्यांमधील अनोख्या नात्याचं जिवंत उदाहरण ठरतो.
who-is-the-man-who-put-on-shoes-with-his-own-hands-prime-minister-narendra-modi